मुंबई - यंदा प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या पथसंचलनात महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचा चित्ररथ दिसणार नाही. गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी यावरुन सरकारवर निशाणा साधला. हे जर काँग्रेसच्या काळात घडले असते तर भाजपने बोंबाबोंब केली असती, आज गप्प का? असा सवालही राऊत यांनी केला.
महाराष्ट्रासह पश्चिम बंगालच्या चित्ररथालाही परवानगी नाकारली आहे. यावर राजकारण होत असल्याचा आरोप विरोधकांनी सरकारवर केला आहे. आता संजय राऊतही यावरुन आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले, त्यांना ट्वीटरवरुन भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला आहे. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कारही मिळाला आहे. महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचाय? यामागे राजकीय षडयतंत्र आहे काय?असा सवालही राऊत यांनी केला.