मुंबई - राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी सुरू असल्या तरी आज ओल्या दुष्काळासंदर्भात बैठक बोलावली होती. शिवसेनेच्या सर्व आमदारांनी सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांना दिले आहेत. आमदारांचा उद्धव ठाकरेंवर विश्वास आहे. योग्यवेळी ते योग्य निर्णय घेतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
योग्यवेळी घेणार निर्णय, उद्धव ठाकरेंना सत्ता स्थापनेचे सर्व अधिकार - एकनाथ शिंदे - महाराष्ट्र सत्ता स्थापन २०१९
आमदार निवासचे काम सुरू आहे. त्यामुळे मुंबई बाहेरच्या आमदारांना रंगशारदामध्ये थांबवण्यात आले आहे. एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. त्यासाठी आमदार असावेत म्हणून त्यांना थांबवण्यात आले असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.

राज्यातील ओल्या दुष्काळासंदर्भात ही बैठक बोलावण्यात आली होती. पावसामुळे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडला आहे. या शेतकऱ्यांना मदत झाली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी तालुका पातळीवर मदत केंद्र तयार करण्याचे आदेश दिले आहेत. शेतकऱ्यांना आधार दिला पाहिजे यासाठी ही मदत होती. शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी, पंचनामे यातील अडचणी दूर करण्यासाठी ही बैठक होती, असे शिंदे यांनी सांगितले.