महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधकांचे खोटे बोलून झाले, आता काम करु द्या - आदित्य ठाकरे - शपथविधी

मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला असता ते म्हणाले, आम्ही जनतेला जो शब्द दिला तो पाळायचा, त्यांची कामे पूर्ण करायची हा माझा मुख्य अजेंडा असेल. जनतेचा जो आवाज आमच्या पर्यंत पोहोचत नाही. त्यांचा आवाज ऐकायचा हे आमचं मुख्य काम असेल, असेही ते म्हणाले.

आदित्य ठाकरे , मंत्री पदाची शपथ घेताना
आदित्य ठाकरे , मंत्री पदाची शपथ घेताना

By

Published : Dec 30, 2019, 4:51 PM IST

Updated : Dec 30, 2019, 7:03 PM IST

मुंबई- महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळ विस्तारचा आज शपधविधी पार पडला. महाआघाडीच्या एकूण 36 मंत्र्यांनी आज शपथ घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली, तर शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य यांनाही मंत्रीपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना मंत्री पदाची शपथ दिली. यावेळी व्यासपीठावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रीमंडळातील सदस्य उपस्थित होते.

विरोधकांचे खोटे बोलून झाले, आता काम करु द्या - आदित्य ठाकरे

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आदित्य ठाकरे यांच्याशी ईटीव्ही भारतने संवाद साधला असता ते म्हणाले, आम्ही जे जनतेला शब्द दिला तो पाळायचा, त्यांची कामे पूर्ण करायची हा माझा मुख्य अजेंडा असेल. जनतेचा जो आवाज आमच्या पर्यंत पोहोचत नाही. त्यांचा आवाज ऐकायचा हे आमचं मुख्य काम असेल असेही ते म्हणाले.

वडील मुख्यमंत्री, मुलगा मंत्री, या बाबत जी टीका होतीय त्याबद्दल बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, की विरोधकांनी आता मिळून राज्याच्या विकासासाठी काम करायला हवे. मात्र, त्यांना टीका करायचीच असेल तर करू द्या, आम्हाला जनतेने आशीर्वाद दिला आहे. आम्ही जनतेचे काम करणार आहोत. यंग ब्रिग्रेड सोबत मिळून काम करेल असाही विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Last Updated : Dec 30, 2019, 7:03 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details