मुंबई -केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांविरोधात देशातील सर्व कामगार संघटनानी उद्या (८ जानेवारी) भारत बंदची हाक दिली आहे. यात भारतीय कामगार सेनेने (शिवसेनेची कामगार आघाडी) भारत बंदमध्ये सहभागी होऊन संपाला पाठिंबा देण्याचे ठरवले आहे. यासंबंधी बेस्ट उपक्रमाच्या परिवहन व वीज पुरवठा कामगारांची व अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई कंपनीमधील नेत्यांची एकत्रित बैठक झाली यात हा निर्णय घेण्यात आल्याचे शिवसेना कामगार नेते विठ्ठलराव गायकवाड यांनी सांगितले.
"शिवसेनेची कामगार संघटना 8 जानेवारीच्या भारत बंदमध्ये होणार सहभागी" हेही वाचा - 8 जानेवारीच्या देशव्यापी संपात मुंबईतील वाहतूक ठप्प होण्याची शक्यता
बृहन्मुंबई परिवहन व वीजपुरवठा कामगारांची संघर्ष समितीची स्थापना ही कामगारांचा हक्कासाठी केलेली आहे. म्हणूनच देशात असलेल्या कामगारांच्या असंतोष पाहत संघर्ष समितीतर्फे बेस्टचा परिवहन व बृहन्मुंबईतील वीजपुरवठा कामगार समर्थनासाठी भारत बंदमध्ये सामील होणार असल्याचे गाकयकवाड यांनी सांगितले.
संपामध्ये सहभागी होण्याचे मुद्दे -
- भारत सरकारचे कामगार विरोधी धोरण.
- खासगीकरण पद्धतीने कामे करून घेण्याचे केंद्र सरकारचे धोरण.
- नोटबंदी जीएसटीमुळे मोठे उद्योगधंदे बंद त्यामुळे बेकारीची प्रचंड संख्या.
- कंत्राटी कामगार कायदा रद्द झाला पाहिजे.
- बेकारी नष्ट करण्यासाठी उद्योग निर्मिती झाली पाहिजे.
- मोदी-शाह यांच्या हुकुमशाही विरोधात.
अशा अनेक प्रश्न घेऊन आम्ही उद्याच्या भारत बंदमध्ये सामील होणार आहोत. अशी प्रतिक्रिया शिवसेना उपनेते व कामगार नेते विठ्ठलराव गायकवाड यांनी दिली.