मुंबई - कष्टकऱ्यांबाबत केंद्र सरकार जी धोरणे राबवत आहे त्या विरोधात आम्ही सरकारमध्ये राहून विरोध केला. आता देखील देशव्यापी संपामध्ये शिवसेना सहभागी होणार असल्याचे शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांनी सांगितले.
येत्या 8 मार्चला होणाऱ्या औद्योगिक देशव्यापी संपाला शिवसेना प्रणित कामगार संघटनेनेही पाठिंबा दर्शवला आहे. या संपात शिवसेना कामगार संघटना रस्त्यावर उतरणार असून विशेषतः विमानसेवा बंद पाडणार असल्याचा इशारा या संघटनेच्यावतीने देण्यात आला आहे.