मुंबई -प्रादेशिक आणि महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाचे स्थान असणाऱ्या शिवसेना पक्षाने कलाबेन डेलकर यांच्या रुपाने राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री केली आहे. दादरा नगर हवेली येथील पोटनिवडणूक सेनेने तब्बल 40 हजार मतांनी विजय मिळवला आहे. दिवंगत खासदार मोहन डेलकर यांच्या पत्नी कलाबेन डेलकर या शिवसेनेच्या महाराष्ट्राबाहेरील पहिल्या खासदार ठरल्या.
काही दिवसांपूर्वी शिवसेनेच्या 55 व्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रीय राजकारणाबाबत संकेत दिले होते. शिवसेनेला आपला पक्ष राज्याबाहेर वाढवायचा आहे. उत्तर प्रदेश, बिहार या राज्यात शिवसेनेने विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उतरवले होते. पण, त्यांना तेथे यश आले नव्हते. मात्र, डेलकर यांच्या रुपाने शिवसेनेचा राष्ट्रीय राजकारणात प्रवेश झाला आहे.
गोव्यात सर्व जागांवर लढवणार निवडणूक