मुंबई- गोवा विधानसभा निवडणुकीच्या ( Goa Assembly Election 2022 ) प्रचाराचा धुरळा लवकरच उडणार ( Shivsena Election Campaign ) आहे. शिवसेनेकडून आदित्य ठाकरे ( Aditya Thackeray ) हे मुख्य चेहरा, खासदार संजय राऊत ( Sanjay Raut ) , मंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) , खासदार अरविंद सावंत ( Arvind Sawant ) यांच्या सारखे स्टार प्रचारक उतरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. येत्या आठवड्यात प्रचार प्रमुखांची यादी जाहीर होईल. दरम्यान, भाजपने सत्ता स्थापनेसाठी देशभरात केलेला घोडाबाजार, गोव्यातील ऑपरेशन लोटसबाबत ( Operation Lotus ) शिवसेनेकडून तोंडसुख घेतले जाईल. भाजपला डोईजड ठरतील, अशा मुद्द्यांवर शिवसेना भर असणार आहे.
पाच राज्यात रणधुमाळी -पाच राज्यांच्या निवडणुका तोंडावर आहेत. कॉंग्रेस ( Congress ), भाजप ( BJP ), सपा ( SP ), आमआदमी पार्टी ( AAP ), शिवसेना ( Shivsena ), राष्ट्रवादी ( NCP ), तृणमूल कॉंग्रेस ( TMC ), स्थानिक प्रादेशिक पक्षांनी मोट बांधली आहे. आपल्या योजना, मोहिम आणि निर्णय मतदारांपर्यंत पोहaचवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. तर दुसरीकडे कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. प्रचारावर निर्बंध असतील. येत्या काही दिवसांत कोरोना आटोक्यात येईल, अशी अटकळ बांधली जात आहे. त्यामुळे जवळपास प्रचाराचा कार्यक्रम आखला आहे. भाजपकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ), केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ( Union Minister Amit Shah ) यांच्यासह अनेक मंत्री प्रचारात उतरतील. काँग्रेसकडून राहुल गांधी ( Rahul Gandhi ), प्रियंका गांधी वाड्रा ( Priyanka Gandhi ) हे प्रमुख चेहरे असतील. आपचे अरविंद केजीरवाल ( Arvind Kejriwal ), तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी ( Mamata Banerjee ), प्रशांत किशोर ( Prashant Kishor ) प्रचारात उतरतील. राष्ट्रवादी तीन राज्यात तर शिवसेना गोवा आणि उत्तर प्रदेशातील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे.
उत्तर प्रदेशात 50 जागांवर लढणार -उत्तर प्रदेश विधानसभा मतदार क्षेत्रात भाजपची सत्ता आहे. सर्वाधिक जागा ज्या पक्षाला मिळतात. तो देशात सत्ता परिवर्तन करतो. उत्तर प्रदेशातील निवडणुकीवर त्यामुळे सर्वांचा फोकस आहे. पण, कोरोना काळात भाजपने नागरिकांना वाऱ्यावर सोडले, असा मतदारांचा आरोप आहे. त्यामुळे भाजपविरोधात सध्या संतापाची लाट असून मोठ्या प्रमाणात नाराजीचे वातावरण आहे. तर समाजवादी पक्ष जोरदार मुसंडी मारण्याची शक्यता आहे. शिवसेनाही या निवडणुकीत नशीब आजमावण्याचा प्रयत्न करणार आहे. सुमारे 50 जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत. या उमेदवारांना मतदार कशाप्रकारे साथ देतील, हे चित्र निवडणुकीनंतर स्पष्ट होईल.