महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भाजपने भ्रमात राहू नये, जोपर्यंत शरद पवार निश्चित तोपर्यंत सरकार भक्कम - शिवसेना - sanjay raut on bjp

शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेले सरकार आपला ५ वर्षाचा कालावधी पूर्ण करेन. ज्यांनी ८० तास सरकार बनवले, त्यांना उद्धव ठाकरेंचे सरकार ८० दिवसही चालणार नाही, असे वाटत आहे. मात्र, त्यांनी भ्रमातून बाहेर यावे, महाविकास आघाडीचे ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण  करेल असा विश्वास शिवसेनेचे मुखपत्र सामनातून व्यक्त करण्यात आला आहे.

shivsena comment on bjp
जोपर्यंत शरद पवार निश्चित तोपर्यंत सरकार भक्कम - शिवसेना

By

Published : Dec 15, 2019, 8:40 AM IST

Updated : Dec 15, 2019, 12:18 PM IST

मुंबई - शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी एकत्र येत स्थापन केलेले सरकार आपला ५ वर्षाचा कालावधी पूर्ण करेन. ज्यांनी ८० तास सरकार बनवले, त्यांना उद्धव ठाकरेंचे सरकार ८० दिवसही चालणार नाही, असे वाटत आहे. मात्र, त्यांनी भ्रमातून बाहेर यावे, महाविकास आघाडीचे सरकार ५ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास शिवसेनेचे मुखपत्र सामनातून व्यक्त करण्यात आला आहे. जोपर्यंत शरद पवार निश्चित आहेत, तोपर्यंत सरकार स्थिर असल्याचेही सेनेने म्हटले आहे.

महाविकास आघाडीचे सरकार चांगला करभार करेल. हे सरकार ५ वर्ष टिकण्यात शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांची भूमिका महत्वाची असल्याचे सेनेने म्हटले आहे. १७० सदस्यांचे बहुमत असलेले सरकार सध्या भक्कम आहे. त्यामुळे ज्यांनी ८० तासांचे सरकार बनवले त्यांनी भ्रमात राहू नये, असा टोलाही सेनेने भाजपला लगावला.

सरकार टिकवण्यात अजित पवारांची भूमिका महत्वाची

महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यात अजित पवारांची भूमिका महत्वाची असल्याचे सेनेने म्हटले आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहून बंड केले होते. त्यांनी भाजपशी हातमिळवणी करत ३ दिवस सत्ता स्थापने केली होती. भाजपच्या आशा अजित पवार यांच्यावर आहेत. मात्र, अजित पवारांची चिंता करु नका, महाविकास आघाडीचे सरकार तेच टिकवतील असा विश्वास खुद्द शरद पवार यांनीच दिल्याचे सेनेने म्हटले आहे.

अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार
उद्यापासून (१६ डिसंबर) नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनाला सुरुवात होत आहे. या अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे सेनेने म्हटले आहे. इतर पक्षातून भाजपमध्ये गेलेले अनेक नेते म्हणत होते की, महाराष्ट्राने देशाला नवी दिशा दिली आहे. त्यामुळे जे महाराष्ट्रात झाले ते इतर राज्यातही घडेल असा विश्वास बाहेरच्या राज्यातील नेत्यांनी व्यक्त केल्याचेही सेनेने म्हटले आहे.

बुलेट ट्रेन कोणासाठी? आजही शंका कायम
बुलेट ट्रेन कोणासाठी? याबाबत आजही शंका कायम असल्याचे सेनेने म्हटले आहे. सर्व महागड्या प्रकल्पांपेक्षा मराठी माणसांच्या, शेतकऱ्यांच्या पोटापाण्याचे प्रश्न सुटावेत अशी सगळ्यांची इच्छा असल्याचे सेनेने म्हटले आहे.

खडसे भाजपपासून तुटलेत
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंना सातत्याने डावलले जात आहे. त्यामुळे ते भाजपपासून तुटले असल्याचे सेनेने म्हटले आहे. ते भाजपमध्ये राहतील असे वातावरण सध्या तरी नाही.

Last Updated : Dec 15, 2019, 12:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details