मुंबई - सरकारने ज्या हिंमतीने कलम ३७० हटवले त्याच हिंमतीने अयोध्येत राममंदिराची उभारणी सुरु करावी, असे ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच राममंदीराची पहिली वीट रचण्यास शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहनही ठाकरेंनी केले.
राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज रहावे - उद्धव ठाकरे - अयोध्येत राममंदिराची उभारणी
सरकारने ज्या हिंमतीने कलम ३७० हटवले त्याच हिंमतीने अयोध्येत राममंदिराची उभारणी सुरु करावी, असे ठाम मत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. तसेच राममंदीराची पहिली वीट रचण्यास शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहनही ठाकरेंनी केले.
सर्वोच्च न्यायालयात अयोध्या व राममंदिरासंदर्भात सुनावणी सुरु असून कोणत्याही क्षणी त्यासंदर्भात निकाल अपेक्षीत आहे. शिवसेनेने राम संदर्भात केलेला संघर्ष व गेल्या वर्षभरात लावलेला रेटा यामुळे सकारात्म गोष्टी घडत असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे. राममंदिर निर्माण कार्य कोणीच रोखू शकत नसल्याचेही ठाकरे म्हणाले.
गेल्या वर्षभरात आपण दोन वेळा अयोध्येत जाऊन राम मंदिर प्रश्नावर जाग आणल्याचेही ठाकरे म्हणाले. अयोध्या आंदोलनात शिवसेनेचे योगदान अमूल्य आहे. देशाने त्याची दखल घेतली आहे. राममंदिराची पहिली वीट रचण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावे, असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केले.