महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेच्या 'वचनपूर्ती' कार्यक्रमात करमणुकीचा तडका - 'वचनपूर्ती' mumbai

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरूवारी शिवसेनेने वांद्र्यातील एमएमआरडीए मैदानावर वचनपूर्तीचा मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, हा कार्यक्रम  डझनभर आजी माजी शिवसैनिक, मंत्र्यांचे सरकार आणि मराठी हिंदी गाण्यांच्या करमणुकीचा तडका देणाराच अधिक ठरला.

mumbai
शिवसेनेच्या 'वचनपूर्ती' कार्यक्रमात करमणुकीचा तडका

By

Published : Jan 24, 2020, 1:53 AM IST

मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून गुरूवारी शिवसेनेने वांद्र्यातील एमएमआरडीए मैदानावर वचनपूर्तीचा मोठा जल्लोष साजरा केला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला. मात्र, हा कार्यक्रम डझनभर आजी माजी शिवसैनिक, मंत्र्यांचे सरकार आणि मराठी हिंदी गाण्यांच्या करमणुकीचा तडका देणाराच अधिक ठरला.

शिवसेनेच्या 'वचनपूर्ती' कार्यक्रमात करमणुकीचा तडका

हेही वाचा -आमचे अंतरंग भगवेच..! मला खोटे ठरवण्याचा प्रयत्न झाल्यामुळे वेगळा मार्ग स्वीकारला

महाराष्ट्रातील दिग्गज अभिनेते, अभिनेत्री यांच्यासोबतच नृत्य आणि गायक अजय अतुल, शंकर महादेवन, जगप्रसिद्ध वादक शिवमनी यांच्या वादनाने उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. परंतू सत्काराचा मुख्य कार्यक्रम केवळ काही मिनिटात उरकला. मुख्यमंत्री ठाकरे यांनीही आपले भाषण न लांबवता थोडक्यात उरकले. त्यामुळे संपूर्ण कार्यक्रम हा करमणुकीचा असल्याचे चित्र होते.

हेही वाचा -मनसे राबवणार 'शॅडो कॅबिनेट', 'असे' असणार काम

या कार्यक्रमाची सुरुवात शिवसेनेच्या शैली प्रमाणे ढोल ताशाच्या गजराने झाली. तर त्याला जोड देत प्रसिद्ध वादक शीवमनी यांनी आपल्या वादनाने वातावरण मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमात अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी यांनी केलेल्या पिंगा या गाण्यातील नृत्याला शिवसैनिकांनी भरभरून दाद दिली. तर अजय-अतुल यांनी गायिलेल्या "युग युग की जांजिरो को हमने ही काटा..बोल उठा ये मर्दे मराठा रे...." आणि "झिंग झिंग झिंगाट..." या गाण्यावर अनेकांनी या ठेका धरला. गायक अवधूत गुप्ते, यांनी शिवसेनेवर तयार केलेले एक गाणं गाऊन उपस्थितांमध्ये उत्साह निर्माण केला. तर ' चला हवा येवू द्या ' कार्यक्रमाच्या टीमने उपस्थितांना हसवले. गायिका बेला शेंडे, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, कुणाल गांजवाला, सुखविंदर सिंग यांनी आपली गाणी सादर करून शिवसेनेच्या वचनपूर्ती कार्यक्रमात रंगत आणली.

दरम्यान, शिवसेनेकडून आजी माजी शिवसैनिक आणि मंत्र्यांचा सत्कार करण्यात आला. यात माजी मंत्री अनंत गीते आणि चंद्रकांत खैरे, माजी मंत्री दिवाकर रावते, खासदार संजय राऊत, मंत्री दादा भुसे, शिवसेना नेते गजानन किर्तीकर, मंत्री सुभाष देसाई, राज्यमंत्री शभुराजे देसाई, मंत्री संदीप भुमरे, राज्यमंत्री बाच्चू कडू, मंत्री अनिल परब, एकनाथ शिंदे, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, शिवसेना नेते, लीलाधर डाके यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

ABOUT THE AUTHOR

...view details