महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दक्षिण मध्य मुंबईचा कार्यकर्ता महामेळावा फ्लॉप - mumbai loksabha

दक्षिण मध्य मुंबई महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचार रणनीती आखण्यासाठी आज दादर येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या महामेळाव्याचा फज्जा उडाला.

कार्यकर्ता मेळावा

By

Published : Mar 31, 2019, 9:50 PM IST

मुंबई - दक्षिण मध्य मुंबई महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांची प्रचार रणनीती आखण्यासाठी आज दादर येथे महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या महामेळाव्याचा फज्जा उडाला आहे. या कार्यक्रमात कार्यकर्त्यांसाठी बसण्याची मोठ्या प्रमाणात व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, अनेक कार्यकर्ते यावेळी अनुपस्थीत होते.

कार्यकर्ता मेळावा

या सभेला मनोहर जोशी, राहुल शेवाळे, प्रसाद लाड आणि भाजप नगरसेवक यांच्या व्यतिरिक्त इतर नेते उपस्थीत नव्हते. यामुळे मोठ्या प्रमाणात खुर्च्या रिकाम्या होत्या. राष्ट्रीय समाज पक्षाचा (रासप) एकही कार्यकर्ता या मेळाव्यात उपस्थित नव्हता. त्यामुळे युतीच्या बाता मारणारे या मेळाव्याला कार्यकर्ते गोळा करण्यात अयशस्वी ठरले की काय? असे बोलले जात आहे. त्यामुळे हा महामेळावा फ्लॉप ठरल्याचे दिसून येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details