महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता संप करूनच दाखवा; शशांक राव यांना खुले चॅलेंज - शशांक राव

शशांक राव यांनी संप करूनच दाखवावा. बेस्ट कामगार सेना आणि शिवसेना बेस्ट वर्कर्स युनियनने केलेला संप मोडीत काढेल, असे खुले आव्हान शिवसेना बेस्ट कामगार नेते व बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी बेस्ट समितीत दिले.

मुंबई

By

Published : Jul 23, 2019, 8:14 PM IST

मुंबई- बेस्ट प्रशासनाकडे चारवेळा पत्र व्यवहार करूनही बेस्ट प्रशासन आम्हाला दाद देत नाही म्हणून ही बेस्ट वर्कर्स युनियनने संपाची घोषणा केली. संपाची घोषणा म्हणजे एकप्रकारे पोकळ धमकी आहे. शशांक राव यांनी संप करूनच दाखवावा. बेस्ट कामगार सेना आणि शिवसेना बेस्ट वर्कर्स युनियनने केलेला संप मोडीत काढेल, असे खुले आव्हान शिवसेना बेस्ट कामगार नेते व बेस्ट समिती सदस्य सुहास सामंत यांनी बेस्ट समितीत दिले.

आता संप करूनच दाखवा; शशांक राव यांना खुले चॅलेंज

बेस्ट वर्कर्स युनियनने 7 जानेवारीला घेतलेल्या संपाच्या वेळी कर्मचाऱ्यांचे मतदान घेतले होते. त्यावेळी कर्मचाऱ्यांनी संपाचा कौल दिल्याने शशांक राव यांनी 9 दिवस संप पुकारला होता. बेस्ट प्रशासनाला घाबरवण्याचा राव यांचा डाव असल्याचा आरोप सामंत यांनी यावेळी केला. तसेच आम्ही 7 जूनला झालेल्या संपात 10 हजार कामगार सहभागी केले, ही मोठी चूक झाल्याचे सामंत म्हणाले.

शिवसेना व सुहास सामंत बेस्टमध्ये मोठे होतील ही भीती राव यांना आहे. वरिष्ठ कर्मचाऱ्यांचा दबाव त्यांच्यावर आला आहे. संपात सहभागी झालेल्या कर्मचाऱ्यांना 9 दिवसांचा पगार मिळाला नाही. बेस्ट वर्कर्स युनियनने केलेला करार अयशस्वी झाला आहे, म्हणून राव यांनी संपाची हाक दिल्याचे सामंत म्हणाले.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details