महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivsena On New Parliament : 'नरेंद्र मोदी नव्या संसदेला आपली मालमत्ता मानतात', शिवसेनेचा 'सामना'तून हल्लाबोल - uddhav thackeray

संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रित न केल्याबद्दल शिवसेनेने भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला आहे. पक्षाने आपले मुखपत्र 'सामना'च्या संपादकीयमधून पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही भाष्य केले आहे.

uddhav thackeray
उद्धव ठाकरे

By

Published : May 26, 2023, 7:53 PM IST

मुंबई : संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन समारंभासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आमंत्रण न दिल्याबद्दल उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (यूबीटी) शुक्रवारी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. पक्षाने आरोप केला की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी नवीन संसद भवनाला आपली मालमत्ता मानतात. पंतप्रधान मोदींना असे वाटते की या परिसराचे निर्माण त्यांनीच केले आहे'.

'सामना'च्या संपादकीयमधून साधला निशाणा : शिवसेनेने आपले मुखपत्र 'सामना'च्या संपादकीयमध्ये देखील या मुद्द्यावरून भाजपला लक्ष्य केले आहे. तसेच भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना 28 मेच्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे की नाही, असा प्रश्न देखील उपस्थित केला आहे. विशेष म्हणजे, काँग्रेस आणि शिवसेनेसह सुमारे 20 विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नवीन संसद भवनाच्या उद्घाटन समारंभावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे.

'संसदेचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे' : पंतप्रधान मोदी रविवारी संसदेच्या नवीन इमारतीचे उद्घाटन करणार आहेत. मात्र नवीन संसद भवनाचे उद्घाटन राष्ट्रपतींच्या हस्ते व्हावे, असे विरोधी पक्षांचे म्हणणे आहे. शिवसेनेने मुखपत्रात म्हटले आहे की, राष्ट्रपती हे देशाचे प्रमुख आणि भारताचे प्रथम नागरिक आहेत. त्यामुळे या पदाचा अवमान होता कामा नये. नवे संसद भवन मी बांधले आहे आणि ती माझी संपत्ती आहे. त्यामुळे फलकावर फक्त माझेच नाव असेल, अशी मोदींची विचारसरणी असल्याचे पक्षाने म्हटले आहे. हा उद्दामपणा लोकशाहीसाठी घातक असल्याचे यात म्हटले आहे.

'निमंत्रण पत्रात विरोधी पक्षनेत्याचे नाव का नाही?' : नवीन संसद भवन कोणत्याही पक्षाचे नसून देशाचे आहे, असे सामन्याच्या संपादकीयामध्ये म्हटले आहे. यासोबतच भाजप नेत्यांकडून लोकशाहीबाबत बोलणे म्हणजे चेष्टा असल्याचा दावाही करण्यात आला आहे. ज्यांच्यामुळे भाजपला अच्छे दिन आले आहेत त्या अडवाणींना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले आहे का, असा सवाल पक्षाने केला आहे. विरोधी पक्षनेत्याला पंतप्रधानांच्या बरोबरीचा दर्जा मिळतो, त्यामुळे निमंत्रण पत्रात विरोधी पक्षनेत्याचे नाव असते तर बरे झाले असते, असेही शिवसेनेने म्हटले आहे.

हेही वाचा :

  1. Inauguration of Parliament House : संसद भवनाच्या उद्घाटनावरून विरोधकांना सुरेश प्रभूंचे आवाहन
  2. Amit Shah : 'काँग्रेस भारतीय परंपरा आणि संस्कृतीचा इतका तिरस्कार का करते?', नव्या संसद भवनाच्या वादावरून अमित शाहंचा हल्लाबोल
  3. New Parliament Building : कॉंग्रेससह 19 विरोधी पक्षांचा नव्या संसद इमारतीच्या उद्घाटनावर बहिष्कार

ABOUT THE AUTHOR

...view details