महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शिवसेनेची लोकसभेसाठीची पहिली २१ उमेदवारांची यादी जाहीर - election

पालघर आणि सातारा या दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप केली नसून २४ तारखेला याबाबतचा निर्णय होणार आहे, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.

शिवसेना

By

Published : Mar 22, 2019, 3:58 PM IST

Updated : Mar 22, 2019, 4:38 PM IST

मुंबई- लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे.राज्यातील ४८ लोकसभा मतदार संघापैकी भाजप२५ तर शिवसेना२३ जागा लढवणार आहे. यापैकी शिवसेनेने २१ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे.पालघर आणि सातारा या दोन मतदारसंघातील उमेदवारांच्या नावाची घोषणा अद्याप केली नसून २४ तारखेला याबाबतचा निर्णय होणार आहे, अशी माहिती शिवसेनेकडून देण्यात आली.

शिवसेना पत्रकार परिषद


शिवसेनेने आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. रविवार २४ ला कोल्हापुरात भाजप-शिवसेना यांच्यात संयुक्त मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात पालघर आणि सातारा या जागेवर लढणाऱ्या उमेदवारांचे नावे जाहीर होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेचे उमेदवार

  • दक्षिण मुंबई - अरविंद सावंत
  • दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
  • उत्तर-पश्चिम मुंबई- गजानन किर्तीकर
  • ठाणे - राजन विचारे
  • कल्याण - श्रीकांत शिंदे
  • रायगड - अनंत गिते
  • रत्नागिरी सिंधुदुर्ग - विनायक राऊत
  • कोल्हापूर संजय मंडलिक
  • हातकणंगले - धैर्यशील माने
  • नाशिक - हेमंत गोडसे
  • शिर्डी - सदाशिव लोखंडे
  • शिरूर - शिवाजीराव आढळराव पाटील
  • औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
  • यवतमाळ-वाशित - भावना गवळी
  • बुलडाणा - प्रतापराव जाधव
  • रामटेक - कृपाल तुमाणे
  • अमरावती - आनंदराव आडसूळ
  • परभणी संजय जाधव
  • मावळ - श्रीरंग बारणे
  • हिंगोली - हेमंत पाटील
  • उस्मानाबाद - ओमराजे निंबाळकर
Last Updated : Mar 22, 2019, 4:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details