मुंबई -वाढती महागाई, पेट्रोल डिझेल व गॅस दरवाढीविरोधात शिवसेनेने मुंबईत ठिकठिकाणी सायकल रॅली काढत आंदोलने केली. भांडुपमध्ये देखील शिवसेना आमदार रमेश कोरगावकर यांच्या नेतृत्त्वाखाली सायकल रॅली काढून पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढी विरोधात केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.
पेट्रोल आणि डिझेलच्या दराने उच्चांक गाठला आहे. केंद्र सरकार लक्ष देत नसल्याच्या निषेधार्थ युवासेना भांडुप तर्फे सायकल रॅली काढण्यात आली होती. यावेळी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांनी सहभागी होत महागाई विरोधात, 'पेट्रोल गेले शंभरी पार, होष में आवो मोदी सरकार', 'हेच का ते अच्छे दिन', 'मोदी सरकार हाय हाय' या घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
हेही वाचा -समीर वानखेडेंनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळवली; नवाब मलिकांचा पुनरुच्चार