मुंबई- देशभरात महागाई वाढत चालली आहे. केंद्र सरकार सतत पेट्रोल आणि गॅसचे दर वाढवत आहे. पेट्रोल दरवाढीमुळे आम्हाला केंद्र सरकारने गाडीवरून सायकलवर आणून ठेवले आहे, अशी टीका शिवसेनेचे ईशान्य मुंबई विभाग प्रमुख राजेंद्र राऊत यांनी केली आहे. पेट्रोल आणि गॅस दरवाढीविरोधात घाटकोपर स्टेशन बाहेर शिवसेनेच्या वतीने सायकल आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलकांनी सायकल रॅली काढत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने जनतेला गाडीवरून सायकलवर आणले - राजेंद्र राऊत - शिवसेना आंदोलन मुंबई
गॅस आणि पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभर शिवसेनेकडून आंदोलन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारने पेट्रोल आणि गॅस दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही राऊत यांनी यावेळी केली.
राज्याचे अधिकार कमी केले -
गॅस आणि पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ राज्यभर शिवसेनेकडून आंदोलन केले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर घाटकोपर रेल्वे स्थानकाबाहेर आंदोलन करण्यात आले. यावेळी राऊत बोलत होते. यावेळी बोलताना सध्या वाहनांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, पेट्रोल दरवाढ होत असल्याने वाहनांऐवजी जी सायकल फक्त व्यायामासाठी वापरली जात होती ती सायकल आता प्रवासासाठी वापरावी लागणार असल्याची टीका राऊत यांनी केली. केंद्र सरकारने पेट्रोल आणि गॅस दरवाढ कमी करून सामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणीही राऊत यांनी यावेळी केली. भाजपाचे नेते राज्य सरकारने कर कमी करून दिलासा द्यावा असे म्हणत आहेत. केंद्र सरकारने जीएसटी कराच्या माध्यमातून राज्याचे अधिकार कमी केले आहेत, असे असताना राज्य सरकार कर कसे कमी करू शकते? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला.
सायकल चालवून निषेध
आंदोलनात शिवसेनेचे नगरसेवक सुरेश पाटील, महिला विभागप्रमुख भारती बावधाने, नगरसेविका रुपाली आवळे, नगरसेविका अर्चना भालेराव आदी शिवसैनिक सहभागी झाले होते. या आंदोलनावेळी रिकामे गॅस सिलेंडर आणून तर सायकली चालवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला.