मुंबई- महाराष्ट्रात तीन पक्षांनी एकत्र येत महाविकासआघाडी स्थापन केली. महाआघाडीच्यावतीने उद्धव ठाकरे यांचा आज सायंकाळी शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस, असे ३ पक्षांनी एकत्र येत सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. शिवसेनेने आमचे सरकार आले, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार, असे सांगितले होते. त्यामुळे आता शिवसेनेचे सरकार आले आहे, आमचा सातबारा कोरा होणार, अशा भावना या कार्यक्रमासाठी मराठवाडा येथून आलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केल्या. त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.
आता शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार - शिवसैनिकांच्या भावना - उद्धव ठाकरे शपथविधी बातमी
आमचे सरकार आले, तर शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करणार असे शिवसेनेने सांगितले होते. त्यामुळे आता शिवसेनेचे सरकार आले आहे, आमचा सातबारा कोरा होणार, अशा भावना या कार्यक्रमासाठी मराठवाडा येथून आलेल्या शिवसैनिकांनी व्यक्त केल्या.
शिवसैनिक