महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivrajyabhishek Din 2023: रायगडावरील गर्दी नियंत्रणाबाहेर, गर्दी नियंत्रणसाठी संभाजीराजेंकडून आवाहन - अडीच लाख मावळे रायगडावर

शिवरायांच्या 350 वा दिमाखदार सोहळ्याचा आज शेवटचा दिवस आहे. शिवप्रेमींनी गडावर तुफान गर्दी केली आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणासाठी संभाजीराजे छत्रपती यांनी आवाहन केले आहे.

Shivrajyabhishek Din 2023
शिवराज्याभिषेक दिन

By

Published : Jun 6, 2023, 8:19 AM IST

Updated : Jun 6, 2023, 12:15 PM IST

पहा रायगड सोहळ्याचा ड्रोन व्हिडिओ

मुंबई : रायगडावर क्षमतेपेक्षा शिवप्रेमी जमले आहेत. दुसरीकडे महाड ते रायगड वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांनी रायगडावर जाण्याचा मार्ग बंद केला आहे. दुर्गराज रायगडवर सध्या जवळपास अडीच लाख लोक उपस्थित आहेत. रायगडाच्या खाली जवळपास ५० - ७५ हजार लोक आलेले आहेत. इतके लोक गडावर सामावणे शक्य नसल्याने कृपया गडाखाली असलेल्या लोकांनी गड चढण्याची घाई करू नये, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे.

  • पुण्यातील शिवराज्याभिषेक सोहळ्याला शरद पवारांची हजेरी लावली आहे. हा सोहळा लाल महालमध्ये होत आहे. शायिस्तेखानाची बोटे तोडलेले ठिकाण म्हणून लाल महालला ऐतिहासिक महत्त्व आहे.
  • कोल्हापुरात पहिल्यांदाच शिवराज्याभिषेक सोहळा साहजा करण्यात येत आहे.

असा असेल आजचा कार्यक्रम :आज मेघडंबरीतील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला सुवर्ण नाण्यांचा अभिषेक केला जाणार आहे. हे नाणे प्राचीन संरचनेप्रमाणे असणा आहे. सोहळा पालखीचा, स्वराज्याच्या ऐक्याचा' या पालखी मिरवणुकीत महाराष्ट्रातील बारा बलुतेदार, अठरा अलुतेदारांसह सर्व धर्मातील लोक सहभागी होऊन सामाजिक एकतेचे दर्शन घडविणार आहेत. पारंपरिक लोककलांच्या मिरवणुकीत राज्याभिषेक दिनानिमित्त जागर घातला जाणार आहे. राजसदर, नगारखाना, होळीचा माळ, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर असा पालखी सोहळ्याच्या मार्गावरून पालखीवर पुष्पवृष्टी केली जाणार आहे.

सर्व शिवभक्तांना महाराजांना अभिवादन करता येईल, तोपर्यंत मी गडउतार होणार नाही, याची शाश्वती मी देतो. कृपया सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन संभाजीराजे छत्रपती यांनी केले आहे. जिल्हा व पोलीस प्रशासन सोबत बैठक झालेली आहे. सध्या गडावर असलेले लोक सकाळी ९ - १० च्या दरम्यान गड उतरणार आहेत. तेव्हा शिस्तबद्ध रीतीने खाली असलेल्या लोकांनावरती सोडले जाईल-संभाजीराजे छत्रपती

रायगडावर 350 वर्षानंतर निघणार भव्य छबिना मिरवणूक: छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याचे यंदाचे 350 वे वर्ष असल्याने शिवप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे . विशेष सोहळ्याचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर राज सदर ते जगदीश्वर मंदिरापर्यंत छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. ही मिरवणुक 350 वर्षानंतर रायगड अनुभवणार आहे. लाखो मावळे किल्ले रायगडावर निघणाऱ्या या छबिना मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन छत्रपती शिवरायांच्या काळातील क्षण अनुभवता येणार आहे. छबिना मिरवणुकीमध्ये चोपदार छत्र, आबदागिरी, मोरचल, अष्टचिन्ह, चवरीसह ऐतिहासिक संदर्भातील साधनासह मावळे सहभागी खास पेहरावात होणार आहेत. महाराष्ट्राला लोककला आणि सांस्कृतिक परंपरा समृद्ध आहे. याचे दर्शन घडवणारे लोक कलाकारही सहभागी होणार आहेत.

या लोककला पाहायला मिळतील : छबिना मिरवणुकीमध्ये सनई चौघडा, तलवारधारी, विटेकरी, भालदार, चोपदार, धन्यूष्यधारी, पट्टेकरी, विविध शस्त्रधारी संत्री, गडावरील मानकऱ्यांसह भारूड, गोंधळी, वासूदेव, पिंगळा, एकतारी सोगी, जागर, तुतारी, पी ढबाक, ढाल तलवार, भगवे निशान, तोफखाना, जरी पटका, मर्दानी खेळ, आदी लोककला सादर केल्या जाणार आहे. महाराष्ट्रातील लोककलाकार पारंपारिक वेशभूषेमध्ये सहभागी होत कार्यक्रमाची शोभा वाढविणार आहेत. याशिवाय 351 ध्वजधारी मावळे बाराबंदी घालून या सभेला मिरवणुकीमध्ये उत्साहाने सहभागी होणार आहेत.

हेही वाचा-

  1. Jitendra Awhad Criticized: राज्य सरकारने आज राज्याभिषेक करून चूक केली, त्यांनी महाराष्ट्राची माफी मागावी - जितेंद्र आव्हाड
  2. Shivaji Maharaj Coronation: छत्रपती शिवाजी महाराजांचा 350 वा शिवराज्यभिषेक दिमाखात होणार साजरा, जाणून घ्या काय असणार कार्यक्रम
  3. Shivrajyabhishek Din 2023: शिवसृष्टीसाठी ५० कोटींचा निधी तर प्रतापगड प्राधिकरणाच्या अध्यक्षपदी उदयनराजे, मुख्यमंत्र्यांची घोषणा
Last Updated : Jun 6, 2023, 12:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details