महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Raut: संजय राऊत यांच्याविरोधातील शिवडी न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट जारी रद्द, पुढील सुनावणी 24 जानेवारीला - अजामीनपात्र वॉरंट जारी रद्द

Sanjay Raut: शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. यावरून मेधा सोमय्या यांनी राऊतांवर अब्रूनुकसानीचा दावा करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. दरम्यान संजय राऊत यांच्या विरोधात न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. तर संजय राऊत यांनी जामीन पत्र वॉरंट रद्द करण्यासाठी न्यायालयात उपस्थित होत अजामिनपात्र वॉरंट रद्द (Non bailable warrant Cancelled) करून घेतले.

Shiv Sena leader Sanjay Raut
शिवसेना नेते संजय राऊत

By

Published : Jan 6, 2023, 3:24 PM IST

Updated : Jan 6, 2023, 5:34 PM IST

मुंबई:शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांच्या विरोधात भाजप नेते किरीट सोमय्या (BJP leader Kirit Somaiya) यांची पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रुनुकसानीचा याचिकेवर आज सुनावणी दरम्यान संजय राऊत उपस्थित न राहिल्याने त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. दरम्यान, जामीन पत्र वॉरंट रद्द करण्यासाठी संजय राऊत यांनी तातडीने शिवडी कोटात दाखल होत अजामीनपात्र वॉरंट न्यायालयासमोर उपस्थित राहून रद्द करून घेतला. या प्रकरणात पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे.

पुढील सुनावणी 24 जानेवारीला : शिवसेना नेते संजय राऊत हे कोर्टात उपस्थित न राहत असल्याने त्यांच्या विरोधात वॉरंट जारी करण्यात यावा असे मागणी डॉ. मेधा सोमय्या यांच्या वकिलांच्या वतीने करण्यात आली होती. त्यानंतर शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयाने संजय राऊत यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केला होता. त्यानंतर तातडीने संजय राऊत यांनी न्यायालयात हजर राहत वकिलानमार्फत अजामीनपात्र वॉरंट रद्द करून घेतला तसेच पुढील सुनावणीला उपस्थित राहणार असल्याचे देखील न्यायालयाला सांगितले आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. या प्रकरणात पुढील सुनावणी 24 जानेवारी रोजी होणार आहे.

फसवणूक करण्यात आल्याचा आरोप: मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील 16 शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता.

हजर राहण्याचे आदेश: त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. दरम्यान याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी त्यांना अनेकवेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. शिवसेना नेते संजय राऊत यांना मागील सुनावणी दरम्यान कारागृहातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे शिवडी न्यायालयात सुनावणी दरम्यान हजर राहण्याची निर्देश दिल्यानंतर त्यावेळी संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांच्यावरील सर्व आरोप योग्य असल्याचे म्हटले होते. आता या प्रकरणात नवीन काय खुलासा होतो हे महत्त्वाचं असणार आहे.

राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा :संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप केला होता. मीरा भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आले आहेत. त्यातील 16 शौचालये बांधण्याचं कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळालं होतं. बनावट कागदपत्रे सादर करून मीरा भाईंदर महापालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक करण्यात आल्याचा आरोप सोमय्यांवर आहे. तसेच साडेतीन कोटींपेक्षा अधिक रुपयांची शौचालयाची बिलेही घेतल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक (Shiv Sena MLA Pratap Sarnaik) यांनी विधानसभेत सर्वप्रथम हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यानंतर पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले. दरम्यान याप्रकरणी मेधा सोमय्या यांनी संजय राऊत यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा ठोकला होता. याप्रकरणी त्यांना अनेकवेळा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते.

काय आहे प्रकरण:मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या काही सार्वजनिक शौचालयांचे बांधकाम आणि देखभालीच्या 100 कोटी रुपयांच्या घोटाळ्यात आपण गुंतल्याचा आरोप करणारे वृत्त 15 व 16 एप्रिलला प्रसिद्ध झाले होते. ते वाचून आपल्याला धक्का बसला असे डॉ. मेधा सोमय्या यांनी तक्रारीत म्हटले आहे. राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलेली वक्तव्यं ही बदनामीकारक आहेत. सर्वसामान्यांच्या नजरेत आपली बदनामी करण्यासाठी ही विधाने करण्यात आल्याचा दावाही डॉ. मेधा सोमय्या यांनी केला आहे.

Last Updated : Jan 6, 2023, 5:34 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details