महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

लॉकडाऊन : शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर, पुढील 3 महिने 5 रुपयांत मिळणार जेवण - Corona virus

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच गाडी चालवत ‘मातोश्री’हून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ते गाडीत एकटेच होते, तर ‘कोरोना’पासून बचावासाठी त्यांनी चेहऱ्याला मास्कही लावला होता.

Shivbhojan Yojana
शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर

By

Published : Apr 7, 2020, 7:21 PM IST

मुंबई- कोरना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे गरिबांनाचे होत असणारे हाल दूर करण्यासाठी राज्य सरकारने शिवभोजन योजनेचा तालुका स्तरावर विस्तार केला आहे. पुढील 3 महिने 5 रुपये इतक्या दरात शिवभोजन थाळी देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर, स्थलांतरीत, बेघर तसेच बाहेरगावचे विद्यार्थी व इतर लोक यांचे जेवणाअभावी हाल होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतःच गाडी चालवत ‘मातोश्री’हून मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी रवाना झाले. सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळत ते गाडीत एकटेच होते, तर ‘कोरोना’पासून बचावासाठी त्यांनी चेहऱ्याला मास्कही लावला होता. सरकारची मर्सिडीज टाळून उद्धव ठाकरे यांनी स्वतःची गाडी वापरली. दोन आठवड्यापूर्वीही उद्धव ठाकरे स्वतः गाडी चालवत बैठकीला गेले होते. त्यावेळी त्यांचे पुत्र पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे मागच्या सीटवर बसले होते. यावेळी मात्र मुख्यमंत्री गाडीने एकटेच गेले. मंत्रिमंडळ बैठक सुरु होण्यापूर्वीच सहभागी मंत्र्यांच्या हातावर खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सॅनीटायझर टाकले.

मंत्रिमंडळाची बैठक

सध्या जिल्हा मुख्यालयी ही शिवभोजन केंद्रे चालविली जातात. ती आता तालुका स्तरावर सुरु होतील. पुढील 3 महिन्यांसाठी शिवभोजनाच्या प्रती थाळीचा दर 5 रुपये इतका करण्यात आला आहे. शिवभोजन थाळीची किंमत शहरी भागात 50 रुपये प्रती थाळी असून ग्रामीण भागात 35 रुपये इतकी आहे. प्रत्येक ग्राहकाकडून मिळालेल्या 5 रुपये एवढ्या रकमेव्यतिरिक्त उर्वरित रक्कम शहरी भागात प्रती थाळी 45 रुपये आणि ग्रामीण भागात प्रती थाळी 30 रुपये असे अनुदान संबंधित केंद्र चालकाला देण्यात येईल. ही भोजनालये सकाळी 11 ते दुपारी 3 या काळात सुरु राहतील. या शिवभोजन केंद्र चालकांना देखील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता ठेवणे, निर्जंतुकीकरण करून घेणे, कर्मचाऱ्यांनी वारंवार साबणाने हात धुणे तसेच मास्कचा वापर करणे अनिवार्य करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details