मुंबई - संपूर्ण राज्यात रविवारी विविध ठिकाणी शिवसेनेच्या शिवभोजन थाळी या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. याचप्रमाणे मुंबईतही महानगर पालिकेच्या नायर रुग्णालयातील स्टाफ कँटीनमध्ये या योजनेचे उद्घाटन करण्यात आले. मुंबई शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांच्या हस्ते या योजनेचे उद्घाटन करण्यात आले.
मुंबईत शिवभोजन थाळीचे उद्घाटन; मात्र, लाभार्थ्यांच्या तुलनेत जागा कमी - Shivbhojan thali mumbai
पालकमंत्री अस्लम शेख यांनी या शिवभोजन योजनेच्या लाभार्थ्यांना थाळीचे वितरण केले.
![मुंबईत शिवभोजन थाळीचे उद्घाटन; मात्र, लाभार्थ्यांच्या तुलनेत जागा कमी shivbhojan thali inaugration by guardian minister aslam shaikh](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5855331-thumbnail-3x2-mum.jpg)
मुंबईतही शिवभोजन थाळीचा शुभारंभ
मुंबईतही शिवभोजन थाळीचे उद्घाटन.
हेही वाचा -अब्दुल सत्तारांच फडणवीसांना शिवभोजन थाळीचं आमंत्रण; सत्तारांनी जिल्हाधिकाऱ्यासोबत घेतला आस्वाद
पालकमंत्री अस्लम शेख यांनी योजनेच्या लाभार्थ्यांना थाळीचे वितरण केले. नायर रुग्णालयात हजारोंच्या संख्येने रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईक येतात. त्यामानाने या ठिकाणी अवघ्या 25 जणांची बसण्याची सोय कँटीनमध्ये आहे. त्यामुळे किती लाभार्थ्यांना याचा फायदा होईल हे आगामी काळात दिसून येईल. मात्र, शिवभोजन थाळीचे जेवण केल्यावर रुग्णांच्या नातेवाईकांनी समाधान व्यक्त केले.
Last Updated : Jan 27, 2020, 10:34 AM IST