मुंबई - वीरशैव लिंगायत समाजाचे नेतृत्व करणाऱ्या शिवा संघटनेने भाजपला जाहीर पाठिंबा दिल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले आहे. तसेच आगामी लोकसभा, विधानसभा आणि सर्व निवडांमध्ये शिवा संघटना महायुतीसोबत असेल असेही तावडे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे. या पत्रकार परिषेदाला पियुष गोयल, शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांची उपस्थिती होती.
शिवा संघटनेचा भाजपला पाठिंबा
आगामी निवडणुकीत राजकीय वाटा देण्यास भाजप तयार आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याच निर्णय घेतल्याचे शिवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर धोंडे यांनी सांगितले.
वीरशैव लिंगायत समाजाला नेतृत्व करणाऱ्या शिवा संघटनेने आज भाजपला जाहिर पाठींबा जारी केल्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना मनोहर धोंडे म्हणाले की, गेल्या २३ वर्षांत ३० जिल्ह्यात घेण्यात आलेल्या सभांमधून पहिल्यांदाच एकमताने राजकीय भूमिका घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आमची संघटना महायुतीचा एक घटक पक्ष असेल. आगामी निवडणुकीत राजकीय वाटा देण्यास भाजप तयार आहेत, त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याच निर्णय घेतल्याचे धोंडे यांनी यावेळी सांगितले.