मुंबई:छत्रपती संभाजीराजे (Chhatrapati Sambhaji Raje) यांनाशिवसेना पुरस्कृत नाहीतर शिवबंधन बांधून (build Shivbandhan) सेनेत प्रवेश केल्यानंतरच पक्षाचा अधिकृत उमेदवार म्हणून पाठिंबा देणार असल्याचे शिवसेनेतर्फे स्पष्ट सांगण्यात आले आहे. याचा अर्थ शिवबंधन बांधले नाही तर शिवसेना पर्यायाचा विचार करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शिवसेना शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर उद्या संभाजीराजे छत्रपती शिवसेनेत पक्ष प्रवेश करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवबंधन बांधूनच राज्यसभेसाठी अर्ज दाखल करण्याचा आदेशवजा निरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी संभाजीराजेंना रविवारी दुपारी पाठवला. मंत्री उदय सामंत, खासदार अनिल देसाई आणि शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी ओबेराय हॉटेलमध्ये जाऊन, ठाकरेंचा निरोप संभाजीराजेंना एकविला. त्यावेळी खासदार संजय राऊत यांनीही शिवबंधनाची अट असल्याचे संभाजीराजेंच्या कानावर घातले. त्यानुसार संभाजीराजेंनी सोमवारी दुपारी 12 पर्यंत शिवबंधन बांधावे यावर ठाकरे ठाम आहेत.
संभाजीराजेंनी शिवसेनेची अधिकृत उमेदवारी स्वीकारणार नसल्याचे आधी जाहीर केले असले तरी आता ठाकरेंच्या भूमिकेवर ते काय प्रतिसाद देणार यावर पुढीस घडामोडी अवलंबून आहेत. ठाकरेंच्या अटी धुडकाणाऱ्या संभाजीराजेंना शिवसेना पुरस्कृत करण्याची तयारी शिवसेनेची असल्याची चर्चा पसरली. नंतर लगेचच काही मिनिटांतच संभाजीराजें थांबलेल्या हॉटेलमध्ये सामंत, देसाई आणि नार्वेकर दाखल झाले आणि शिवबंधनसाठी निमंत्रण दिले.