महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एका वर्षात "शिवभोजन थाळीने" भागवली तीन कोटीहून अधिक लोकांची भूक - uddhav thackeray on Shiv Bhojan scheme

शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून योजना सुरु झाल्यापासून आतापर्यत ३ कोटी ५ लाख ३९ हजार ६४४ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा अस्वाद घेतला आहे.

Slug shiv senas Shiv Bhojan scheme completes one year, three crore subsidized thalis served
एका वर्षात "शिवभोजन थाळीने" भागवली तीन कोटीहून अधिक लोकांची भूक

By

Published : Jan 28, 2021, 6:46 AM IST

मुंबई -शिवभोजन योजनेच्या अंमलबजावणीला वर्ष पूर्ण झाले असून योजना सुरु झाल्यापासून आतापर्यत ३ कोटी ५ लाख ३९ हजार ६४४ नागरिकांनी शिवभोजन थाळीचा अस्वाद घेतला आहे. शिवभोजन थाळीने लाखोच नाही तर कोट्यावधी लोकांची भूक भागवण्याचे काम केले असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज्यात ९०५ शिवभोजन केंद्रे
राज्यातील गरीब आणि गरजू जनतेला सवलतीच्या दराने जेवण उपलब्ध करून देण्यासाठी गेल्यावर्षी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता. एक वर्षभरात शिवभोजन योजनेअंतर्गत ९०५ केंद्र सुरु झाले असून योजनेवर आतापर्यंत ८६.१० कोटी रुपयांचा खर्च झाला आहे.

सुरुवातीला लाभार्थ्यांना योजनेअंतर्गत १० रुपयांमध्ये जेवण उपलब्ध करून दिले जात होते. परंतू कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर २९ मार्च २०२० पासून ही थाळी फक्त ५ रुपयांमध्ये उपलब्ध करून दिली जात आहे. प्रत्येक थाळीमागे शहरी भागात ४५ तर ग्रामीण भागात ३० रुपयांचे अनुदान शासनामार्फत केंद्रांना ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून दिले जात आहे. योजनेसाठी "शिवभोजन" ॲप तयार करण्यात आले असून त्याचा वापर करूनच शिवभोजन थाळी वितरित करणे बंधनकारक करण्यात आले आहे. योजनेचा तालुकास्तरापर्यंत विस्तार झाला आहे.


वितरित थाळींची महिनानिहाय संख्या

  • जानेवारी- ७९,९१८
  • फेब्रुवारी- ४,६७,८६९
  • मार्च- ५,७८,०३१
  • एप्रिल- २४,९९,२५७
  • मे- ३३,८४,०४०
  • जून- ३०,९६,२३२
  • जुलै- ३०,०३,४७४
  • ऑगस्ट- ३०,६०,३१९
  • सप्टेंबर- ३०,५९,१७६
  • ऑक्टोबर- ३१,४५,०६३
  • नोव्हेंबर- २८,९६,१३०
  • डिसेंबर- २८,६५,९४३
  • जानेवारी २०२१ (२५ जानेवारी २०२१ पर्यंत) २४,०४,१९

हेही वाचा -ओमकार ग्रुपचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टरला अटक; ईडीची कारवाई

हेही वाचा -राज्यात आज 41 हजार 470 आरोग्य कर्मचाऱ्यांना लस

ABOUT THE AUTHOR

...view details