मुंबईBhakti Shakti Samvad Yatra:आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाने आता महाराष्ट्रात भक्ती आणि शक्ती संवाद यात्रा काढण्याचा निर्णय घेतला आहे. (Shinde Group Yatra) ही संवाद यात्रा महाराष्ट्रात येत्या 25 डिसेंबर पासून 28 फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार आहे. या संवाद यात्रेत महाराष्ट्रातील नानाविध भक्ती पंथ, तीर्थक्षेत्र आणि आध्यात्मिक क्षेत्रातील सर्व कीर्तनकार, प्रवचनकार, निरूपणकार तसेच गावोगावी असणारे भजन मंडळ सहभागी होणार आहे. यासोबत शक्तीचा अर्थात हिंदुत्वासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या सकल शिवशंभो विचारांना समाजापर्यंत नेणाऱ्या सर्व युवक, गोरक्षक आणि ज्येष्ठांशी संवाद साधण्यासाठी धर्मवीर आध्यात्मिक सेनेच्या वतीने भक्ती शक्ती संवाद यात्रा राज्यातील 36 जिल्ह्यामध्ये विभाग वार प्रवास करणार असल्याची माहिती अक्षय महाराज भोसले यांनी दिली. (CM Eknath Shinde)
दररोज कीर्तन, प्रवचन:संवाद यात्रा पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकण अशा पाच टप्प्यात होणार आहे. या समाजातील शिवसेना पक्षाचे स्थानिक खासदार, आमदार, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासेना कार्यकर्ते आणि हिंदुत्ववादी संघटनांची भेट तसेच संवाद साधला जाणार आहे. यामध्ये विशेष बैठका, गावभेटी आणि सभा यांचे देखील आयोजन असणार आहे. तसेच दररोज दिवसाची सांगता हजारो लोकांच्या उपस्थितीत कीर्तनाने होणार आहे. यावेळी यात्रेत विविध पंथांचे प्रचारक आणि संतांचे वंशज देखील सहभागी होणार असल्याचे भोसले यांनी सांगितले.