मुबई: शिवसेनेचे विश्वासु नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारले आणि महाराष्ट्रात राजकीय संकट निर्माण झाले. सर्वाधिक आमदार असलेल्या भाजपला सत्तेपासुन दुर ठेवण्यासाठी तडजोड करत शिवसेनेने धक्का दिला पण आता शिवसेनेचे सत्तेत तरी पतन होताना पहायला मिळत आहे. शिवसेना नेत्यांवर झालेली ईडीची कारवाई, समन्वयाचा अभाव, हिदुत्वाची भुमीका, मुख्यमंत्र्यांचा दुरावा, सरकारमधे काम न होणे ही प्रमुख कारणे असल्याचे समोर येत आहे. याच सोबत शिवसेनेतील नाराजीचा स्फोट झाला आणि नेमक्या त्याच वेळी बंडखोरांना बळ मिळाल्यामुळे शिवसनेचे पानीपत झाल्याचे पहायला मिळत आहे.
बंडखोरांची राऊतांवर मोठी नाराजी:बंडखोर आजही स्वत: ला शिवसैनिक मानतात बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे यांच्या बाबत चांगले बोलतात. शिवसेनेला सत्तेतुन बाहेर पडावे लागले यासाठी अनेक कारणे आहेत. यातील सगळ्यात महत्वाचे कारण शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत असल्याचे बंडखोर सांगतात. बंडांच्या नाट्या नंतर राऊतांनी बंडखोरांबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे नाराजी वाढलेली आहे. राऊत दररोज सकाळी माध्यमा समोर केंद्र सरकारवर टीका करतात. ते अर्धे शिवसेनेचे तर अर्धे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आहेत. असाही त्यांच्यावर आरोप आहे. बंडखोरांवर त्यांनी वाईट भाषेत टीका केली त्यावर मोठा राग आहे. सोबतच राऊतां सारखी माणसे शिवसेना संपवत आहेत आणि बाळासाहेबांची शिवसेना आम्ही पुढे घेऊन जात आहोत असा त्यांचा दावा आहे.
भाजपने आणले अडचणीत: सरकारला अडचणीत आनण्याची एकही संधी भाजपने सोडली नाही. आम्ही सरकार पाडणार नाही सरकार आपोआप पडेल असे सांगतानाच वेगवेगळ्या मुद्यांवरुन सरकारला अडचणीत आणताना नाराजांना गोंजरण्याचे काम भाजपने केले आणि गाफील शिवसेनेला खिंडार पडले. महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्या पासून भाजपने सरकारला प्रत्येक मुद्यावर आणि सगळ्या पातळीवर घेरण्याचा प्रयत्न केला. अधिवेशन असो वा इतर काेणताही उपक्रम सरकारवर निश्क्रियतेचा ठपका ठेवत गाजावाजा केला.
ई़डीच्या कारवाया: राज्यात राज्य सरकार विरुध्द केंद्रिय तपास यंत्रणा हा सामना चांगलाच रंगला भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर आव्हानच स्विकारले आणि मुख्यमंत्र्यांसह अनेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. शिवसेनेचे अनिल परब, संजय राऊत, प्रताप सरनाईक, भावना गवळी, अर्जुन खोतकर, आनंद अडसुळ, यशवंत जाधव अशा नेत्यांवर इडीच्या धाडी पडल्या आहेत. अनेकजण चोकशीच्या फेऱ्यात आहेत. तर अनेकांच्या संप्पतीवर टाच आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या पत्नी तसेच मेव्हणे आणि नेत्यांच्या नातेवाईकांवरही आरोप आणि चौैकशीची टांगती तलवार आहे. चौकशीचा ससेमीरा नको म्हणुन अनेक नेते उध्दव ठाकरे यांना भाजपशी जुळवुन घेण्याची मागणी करत होते.
मुख्यमंत्र्यांचा दुरावा:उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्विकारल्या पासुन शिवसेनेत धुसफुस होती. यातच सरकार स्थापनेनंतर आलेले कोरोना संकट तसेच त्या नंतर उध्दव ठाकरे यांचे आजारपण त्यांच्यावर झालेली शस्त्रक्रिया या सगळ्या प्रकारात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे व्हिडिओ काॅन्फरन्सच्या माध्यमातुन बैठका समारंभ यात सहभागी होत होते. राष्ट्रवादी तसेच काॅग्रेसचे सगळे नेते प्रत्यक्ष हजर असायचे मुख्यमंत्री घरात बसुन राज्याचा कारभार पाहतात असा आरोप विरोधकांकडून सातत्याने होत गेला. पक्षातील पदाधिकारी नेते तचेच सामांन्यांचीही तीच भावणा झाली.