महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पनवेल; पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेचे बैलगाडी आंदोलन - शिवसेना आंदोलन न्यूज

कोरोना लॉकडाऊनंतर अनेक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती शंभरी गाठत आहेत तर डिझेल दरवाढ 80 रुपयांवर पोहोचली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीही 720 रुपयांवर पोहचल्या आहेत.

पनवेल; पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेचे बैलगाडी आंदोलन
पनवेल; पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेचे बैलगाडी आंदोलन

By

Published : Feb 5, 2021, 4:09 PM IST

Updated : Feb 5, 2021, 4:54 PM IST

पनवेल (ठाणे)-केंद्र सरकारने केलेल्या पेट्रोल आणि डिझेलच्या वाढी विरोधात पनवेलमध्ये शिवसेनेच्यावतीवने बैलगाडी आंदोलन करण्यात आले. रायगड जिल्हाप्रमुख शिरीष घरत व शिवसेना नेते रामदास शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. तसेच नवी मुंबई शहरातही कोकण विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर बैलगाडी आंदोलन करण्यात आले.

पनवेल; पेट्रोल दरवाढी विरोधात शिवसेनेचे बैलगाडी आंदोलन
पेट्रोल व डिझेल दरवाढीचा निषेध-पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या किंमतीचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. तसेच जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतीही गगनाला भिडत आहेत. त्यामुळे नागरिकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. शिवसेना कार्यकर्त्यांनी पनवेलमध्येमध्ये बैलगाडी आंदोलन करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवल. तसेच नवी मुंबईत देखील कोकण विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाबाहेरही बैलगाडी आंदोलन करण्यात आले. कोरोना काळात अनेक वेळा दरवाढकोरोना लॉकडाऊनंतर अनेक वेळा पेट्रोल डिझेलच्या दरात वाढ झाली. पेट्रोलच्या किमती शंभरी गाठत आहेत तर डिझेल दरवाढ 80 रुपयांवर पोहोचली आहे. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीही 720 रुपयांवर पोहचल्या आहेत.
Last Updated : Feb 5, 2021, 4:54 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details