महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अक्षराचे भान हरपू नका अन्यथा 'मृता'वस्थेत जाल; नीलम गोऱ्हेंचा अमृता फडणवीसांना टोला - अमृता फडणवीस यांची शिवसेनेवर टीका

अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख 'शवसेना' असा केला आहे. याला प्रत्युत्तर देताना "एका शब्दाचे महत्व असते. अमृता या नावातील 'अ' या अक्षराचे भान हरपू नका अन्यथा 'मृता'वस्थेत जाल, असा टोला विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी लगावला आहे.

नीलम गोऱ्हे यांचा अमृता फडणवीसांना टोला
नीलम गोऱ्हे यांचा अमृता फडणवीसांना टोला

By

Published : Nov 13, 2020, 8:35 PM IST

मुंबई- भाजप आणि शिवसेनेच्या आरोप-प्रत्यारोपात अधून मधून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस याही उडी मारून शिवसेनेवर टीका करत आहेत. अमृता फडणवीस यांनी शिवसेनेचा उल्लेख 'शवसेना' असा केला आहे. याला प्रत्युत्तर देताना "एका शब्दाचे महत्व असते. अमृता या नावातील 'अ' या अक्षराचे भान हरपू नका अन्यथा 'मृता'वस्थेत जाल, असा टोला विधानपरिषदेच्या उपसभापती व शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी लगावला आहे.

बोलताना शिवसेना प्रवक्त्या नीलम गोऱ्हे

एका शब्दाचे महत्व -

बिहारमध्ये 'शवसेनेने' आपल्या सहकार्यांचे मुडदे पाडलेत, अशा शब्दात अमृता फडणवीस यांनी शिवसेनेवर टीका केली. अमृता यांनी आपल्या ट्वीटमध्ये शिवसेनेचा उल्लेख 'शवसेना' असा केला आहे. त्यावर शिवसेना नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांनी अमृता फडणवीस यांना प्रत्युत्तर दिले आहे. त्या म्हणाल्या की, "एका शब्दाचे महत्व असते. अमृता या नावातील 'अ' या अक्षराचे भान महत्त्वाचे आहे. आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जाऊ देऊ नका."

योगा करा मनस्वास्थ चांगले राहील

अमृताताई या दिपावलीच्या दिवसात अमंगल विचार मनात आणू नका. शिवसेनेला अभद्र नावे ठेवून आपले कल्याण होणार नाही, आपल्या नावातील 'अ' मृतावस्थेत जाऊ देऊ नका, 'अ' मृतावस्थेत गेल्यास नावात फक्त 'मृता' राहील. पंतप्रधान मोदी नेहमी योगा करण्याचे सांगतात, तसा अधूनमधून योगा करत जा मनस्वास्थ चांगले राहते." असे गोऱ्हे यांनी म्हटले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details