मुंबई- येथील विमानतळाजवळील 'द ललित' या हॉटेलमधून आज शिवसेनेच्या सर्व आमदारांना हलवण्यात येणार आहे. त्यांचा मुक्काम लेमन ट्री नावाच्या हॉटेलमध्ये असणार आहे.
शिवसेनेच्या सर्व आमदारांना हॉटेल ललितमधून लेमन ट्री हॉटेलमध्ये हलवणार - MahaPoliticalTwist
आतापर्यंत अनेक बैठका अनेक खलबतं या ललित हॉटेलमध्ये झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे युवा सेना नेते आदित्य ठाकरे एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी या हॉटेलला अनेकदा भेटी दिल्या. मात्र, आता आमदारांना लेमन ट्री या हॅाटेलमध्ये हलवण्यात येणार आहे.
हेही वाचा-अजित पवार दिशाभूल करत आहेत; भाजपसोबत आघाडीचा प्रश्नच नाही, शरद पवारांचा पलटवार
आतापर्यंत अनेक बैठका, अनेक खलबतं या ललित हॉटेलमध्ये झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा सेना नेते आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे आणि शिवसेनेच्या अनेक बड्या नेत्यांनी या हॉटेलला अनेकदा भेटी दिल्या. आमदारांची विचारपूस केली. या संपूर्ण हॉटेलच्या परिसराला मुंबई पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचाही खडा पहारा या हॉटेलला आहे. आता यात सुरक्षाव्यवस्थेत शिवसेनेच्या सर्व आमदारांना दुसऱ्या हॉटेलमध्ये स्थलांतरित करण्यात येणार आहे, अशी माहिती समोर आली आहे.