मुंबई : महाराष्ट्रात भाजपाच्या मदतीने एकनाथ शिंदे यांनी बंड केले आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार कोसळले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेली नव्या सरकारची स्थापना, 16 आमदारांच्या अपात्रतेचा वाद, विधानसभा उपाध्यक्षांविरोधातील अविश्वास प्रस्ताव अशा विविध याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात एकत्रित सुनावणी झाली. ( Hearing in Supreme Court ) 1 नोव्हेंबर रोजी या प्रकरणांवर सुनावणी झाली, तेव्हा न्यायाधीशांनी दोन्ही गटांना कागदपत्रे सादर करण्याचे आदेश दिले होते. (Arguments from both groups) त्यानुसार, 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी होणार होती. ( Supreme Court ) त्यावेळी पाच न्यायमूर्तींपैकी न्यायमूर्ती कृष्ण मुरारी उपलब्ध नव्हते. त्यामुळे सुनावणी लांबणीवर पडली होती. सर्वोच्च न्यायालयाने १० जानेवारी २०२३ ची तारीख दिली होती. ही सुनावणी आता १४ फेब्रुवारीला होणार आहे. तसेच सरन्यायाधीश धनंजय चंद्रचुड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार असल्याचे स्पष्ट केले होते. ( hear pleas related to Dhanushyabaana in Shiv Sena on January 12 ) त्यानुसार येत्या आठवड्यात धनुष्यबाण चिन्ह कोणाचा या वादावर सुनावणी होणार आहे. ( Shiv sena uddhav vs eknath shinde )
15 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्र : शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्यावतीने जवळपास 15 लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्यांचे पत्र आणि तीन लाखाच्या जवळपास शपथपत्र केंद्रीय निवडणूक आयोगामध्ये आतापर्यंत सादर करण्यात आलेले आहे. त्याच बरोबर बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्यावतीने 7 लाख सदस्यांची नावे केंद्रीय निवडणूक आयोगाला देण्यात आलेली आहे. ठाकरे गटाने शिंदे गटापेक्षा दुप्पट सदस्यांची यादी दिल्याने त्यांचे पारडे जड मानले जाते. ( Shiv sena uddhav vs eknath shinde plea )