मुंबई : आज शिवसेनेचा 57 वा वर्धापनदिन आहे. याच दिवशी 1966 साली शिवसेनेची स्थापना झाली होती. दरम्यान एक असलेली शिवसेना आज दोन झाली आहे. याच कारणामुळे आज दोन वर्धापन दिन सोहळे पार पडणार आहेत. शिवसेना आणि ठाकरे गट आपापले वर्धापनदिन साजरे करणार आहेत. या दोन्ही कार्यक्रमाला शिवसैनिक मोठ्या संख्येने हजर राहणार आहेत. या 57 वर्षात शिवसेनेत अनेक वादळे आली आणि गेली. शिवसेने सर्व वादळांचा आणि आव्हानांचा मोठा सामना केला आहे. प्रत्येक मराठी माणसाच्या मनात शिवसेना बसलेली आहे.
अनेकांच्या मनातील प्रश्न :मराठी माणसांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि हिंदुत्वाचा आवाज बुलंद करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना केली होती. या शिवसेनेने अनेकांना न्याय मिळवून दिला आहे. पण आज शिवसेना दोन भागात विभागली गेली आहे. सर्व मराठी माणसांना एकत्र आणणारी शिवसेना आपल्या अंतर्गत वादामुळे दोन गटात विभागली गेली आहे. आजही प्रत्येक मराठी माणसाच्या मनात शिवसेना आहे. त्याच कारण तसेच आहे. शिवसेना जेव्हा स्थापन झाली त्यावेळी बाळासाहेब ठाकरेंनी मराठी माणसांना न्याय मिळवून दिला होता. शिवसेनेची अॅक्शन अनेकांचा घाम काढणारी होती. याचमुळे याला भगवे वादळ म्हटले जात परंतु शिवसेनेत अंतर्गत वादाचा वादळ आले आहे. इतर वादळाप्रमाणे शिवसेना या वादळातून बाहेर पडेल का असा प्रश्न बहुतेकांना पडला आहे.
शिवेसना नाव का ठेवले : आज शिवसेना 57 वर्षाची झाली आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना जेव्हा स्थापन केली त्यावेळी उद्धव ठाकरे हे फक्त 6 वर्षांचे होते. बाळ केशव ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना स्थापन केली. शिवसेनेला शिवेसना नाव उद्धव ठाकरे यांचे बाबांनी दिले. बाबा म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव ठाकरे हे प्रबोधनकार ठाकरे या नावाने ओळखले जातात. त्यांच्या विवेकवादी आणि सुधारणावादी कार्यामुळे त्यांना हे नाव दिले गेले आहे. प्रबोधनकार ठाकरे यांनी संघटनेला शिवसेना हे नाव दिले. शिव म्हणजे महादेव नव्हे तर महाराष्ट्राचे प्रतीक असलेल्या शिवाजी महाराजांसाठी आहे आणि ‘सेना’ म्हणजे लष्कर. मुंबईतील मूळ मराठी लोकांसाठी एक चळवळ उभी करणे. ज्यांना नोकऱ्यांच्या संधी मिळवून देण्यासाठी शिवसेना काम करू लागली होती. शिवसेनेचा पहिला मेळावा 30 ऑक्टोबर 1966 रोजी विजया दशमीच्या दिवशी बाळासाहेब ठाकरे यांनी नागरिकांना संबोधन केले होते. त्यावेळी त्यांनी राजकारणाला "एक्झिमा" असे संबोधले होते. यामुळे शिवसेना फक्त 20 टक्के राजकारण आणि उर्वरित 80% कार्य सामाजिक कार्य करेल असे सांगितले होते.
दोन गट आणि दोन स्थापना दिवस (सेना विरुद्ध सेना): एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर त्यांनी भाजपसोबत सत्तेची चूल मांडली. त्यानंतर शिंदे मुख्यमंत्री होत त्यांनी थेट शिवसेनेच चिन्ह आणि नावावर आपला हक्क सांगू लागले. या प्रकरणी निवडणूक आयोगाने शिंदे गटाच्या बाजून निर्णय दिला. यामुळे हा वर्धानपन दिन त्यांच्यासाठी पहिला असेल. परंतु या दिवशी दोन्ही गटाच्या शिवसेनेकडून वेगवेगळे कार्यक्रम केले जाणार आहेत.
शिवसेनेचे यश: सर्वात मोठ्या प्रादेशिक राजकीय पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेकडे अनेक आघाडीच्या जनसंघटना आहेत. त्यांची नावे भारतीय विद्यार्थी सेना नावाची विद्यार्थी शाखा, युवासेना नावाची पक्षाची युवा शाखा आणि शिवसेना महिला आघाडी नावाची महिला शाखा, अशी आहेत. या विविध शाखांनी समाजाच्या विविध विभागांच्या हितसंबंधांचे लक्षणीय समर्थन केले आहे. या आघाडीच्या संघटनांच्या शाखा महाराष्ट्रातच नाही तर इतर राज्यातही आहेत. मध्य प्रदेश, जम्मू-काश्मीर, राजस्थान, बिहार आणि केरळ या राज्यांमध्ये या शाखा कार्यरत आहेत. महिला आघाडी मुंबईतील घरातील घरगुती वाद मिटवते. या संघटनेच्या सक्रिय सहभागामुळे कुटुंबातील महिलांचे अत्याचार कमी झाले आहेत. शिवसेनेचा दावा आहे की महाराष्ट्र राज्यातील उच्च दर्जाच्या उद्योगपतींना मोठ्या प्रमाणात मदत केली आहे, कारण त्यांच्या कठोर नियमांमुळे उद्योगांमध्ये शांततापूर्ण कामकाजाची परिस्थिती मोठ्या प्रमाणात राखली गेली आहे. यामुळे उद्योगाची उत्पादकता वाढली, असा पक्षाचा दावा आहे. शिवसेनेने कामगारांच्या कामगार संघटना आणि सीपीआय आणि सीपीआय-एम सारख्या डाव्या पक्षांच्या कामगार शाखांशी वारंवार वाद होत असतो.
महाविकास आघाडीची स्थापना :अनेकांना माहिती आहे की, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप आणि शिवसेनेची युती होती. परंतु निवडणूक झाल्यानंतर ही युती मुख्यमंत्री पदाच्या मागणीवरुन तुटली आहे. भाजपसोबत सोडचिठ्ठी करत शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करत सरकार स्थापन केले होते.