मुंबई: भाजप नेते मोहित कंबोज (BJP leader Mohit Kamboj) हे एकटे प्रवास करत असताना त्यांच्यावर हल्ला झाला, त्यांचे नेतेही एकटेच प्रवास करतात, त्यांच्यासोबतही असेच होऊ शकते, हे शिवसेनेने विसरू नये. असे सांगत आम्ही उत्तर देऊ आणि मागे हटणार नाही असे भाजप आमदार आशिष शेलार यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे. राणा दाम्पत्यांने मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचण्याची घोषना केल्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. शिवसैनिक मातोश्रीवर पहारा देत आहेत. तेथे कंबोज गेल्यामुळे शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला होता. या पार्श्वभुमीवर शेलार बोलत होते.
Shelar on Shivsena : त्यांचे नेतेही एकटेच प्रवास करतात हे शिवसेनेने विसरु नये - शेलार
त्यांचे नेतेही एकटेच प्रवास करतात (their leaders also travel alone) त्यांच्या सोबत पण असेच होउ शकते हे शिवसेनेने विसरु नये (Shiv Sena should not forge) अशी धमकी भाजप आमदार आशिष शेलार (BJP MLA Ashish Shelar) यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत दिली आहे. मोहित कंबोज हल्ला प्रकरणावरुन त्यांनी शिवसेनेवर टीका केली
आम्ही मुंबई पोलीस आयुक्तांना भेटणार आहोत आणि भाजपच्या पोल खोल मोहिमेवर आणि मोहित कंबोज यांच्यावरील हल्ल्यांबाबत गृहमंत्र्यांची भेट घेणार आहोत. राष्ट्रपती राजवटीची आमची मागणी नाही पण कायदा आणि सुव्यवस्था अशी आहे की राष्ट्रपती राजवट असावी असे सांगताणाच त्यांनी हनुमान चालीसाच्या विरोधात का आहेत, असा प्रश्न शिवसेनेला विचारायचा आहे. जोपर्यंत आमदार रवी राणांचा प्रश्न आहे, तो पर्यंत मी त्याच्यावर बोलणार नाही, ते या प्रश्नाला उत्तर देण्यास सक्षम आहेत असेही शेलार यांनी स्पष्ट केले.