मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या छायाचित्रावर हातोडा उचलण्यात आल्याने, संतप्त शिवसैनिकांनी पालिका अधिकाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप आहे. अनिल परब यांच्यावर देखील मारहाण केल्याचा आरोप आहे. त्या संदर्भात अटकपूर्वक जामीन मिळण्यासाठी माजी मंत्री अनिल परब यांनी सत्र न्यायालय धाव घेतली होती. त्या बाबत न्यायालयात आज झालेल्या सुनावणीमध्ये अनिल परबसह इतर आरोपीना सत्र न्यायालयाच्या राहुल रोकडे यांनी 6 जुलै पर्यंत दिलासा दिला आहे.
जामीन अर्जावर 6 जुलै पर्यंत दिलासा : उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे ह्या प्रकरणात आरोपी असलेले माजी मंत्री आमदार अनिल परब यांच्यासह इतर आरोपी स्नेहा साटम, दीपक गुटकर, दिनेश कुबल, संदीप शिवलकर, चंद्रशेखर वाईंगणकर, एवढे अटकपूर्व जामीन तर, याच प्रकरणात अर्थर रोड तुरुंगात असलेले आरोपी सदानंद कदम, संतोष कदम, उदय दळवी, हाजी आलिम खान यांच्या जामीन अर्जावर 6 जुलै पर्यंत दिलासा दिला आहे.
यांना जामीन मंजूर : या प्रकरणांमध्ये सदानंद परब, संतोष कदम, उदय दळवी, माजी नगरसेवक हाजी हलीम खान यांना जामीन मंजूर केला गेला. प्रत्येकाला वैयक्तिक 15000 रुपयांच्या जात मुचलक्यावर हा जमीन मंजूर झाला. या आरोपींना 11 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली होती. मात्र आता त्यांचा अखेर जामीन मंजूर झाला. तसेच अनिल परब माजी मंत्री आणि आमदार यांना देखील असाच जामीन अखेर मंजूर करण्यात आला. त्यामुळे या प्रकरणांमध्ये अनिल परब यांना मोठा दिलासा मिळाला आहे.