मुंबई :मुंबईतील ठाकरे गटाचे शिवसेना शाखा कार्यालय महानगरपालिकेने जमीनदोस्त केल्याबाबत तेथे कारवाई करत असताना पालिका अधिकाऱ्याला काही कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबाबत चार कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी न्यायालयाने सुनावली. मात्र ठाकरे गटाकडून तात्काळ जामीनासाठी अर्ज आज सत्र न्यायालयात नुकताच दाखल करण्यात आला. परंतु न्यायालयाचे न्यायाधीश सुट्टीवर असल्यामुळे सुनावणी झाली नाही. आता या प्रकरणी दुसऱ्या न्यायालयाकडून 4 जुलैपर्यंत त्यांना दिलासा मिळाला आहे.
जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज : मुंबई येथील वांद्रे पूर्व परिसरामध्ये उद्धव ठाकरे गटाचे 40 वर्षापासून जुने शिवसेना शाखेचे कार्यालय आहे. हे कार्यालय बेकादेशीर असल्याचे महानगरपालिकेचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांनी त्या कार्यालयावर कारवाई केली. ते जमीनदोस्त केले. ती कारवाई करत असताना काही कार्यकर्ते यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत पालिका अधिकाऱ्यांनी तसा गुन्हा देखील पोलीस ठाण्यामध्ये दाखल केला होता. त्यानुसार या चार कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. अटकेनंतर त्यांना आता मुंबई सत्र न्यायालयात हजर केले आहे. त्यांना 11 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी दिली गेली आहे. या प्रकरणी एकूण नऊ शिवसैनिक व्यक्तींवर आरोप आहे. त्यापैकी दोन महिला आहेत. त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने युद्ध पातळीवर जामीन मिळण्यासाठी सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. परंतु आता तातडीने दुसऱ्या न्यायालयामध्ये अर्ज दाखल करून जामीन मिळण्याशिवाय पर्याय नाही.
पालिका अधिकाऱ्यांना मारहाण :मुंबईतील जुन्या शिवसेनेच्या 40 वर्षापासूनच्या जुन्या कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा होती. कारवाई करत असताना या प्रतिमांना बाहेर नेण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली होती केली. मात्र अधिकाऱ्यांनी या महापुरुषांच्या प्रतिमा काही तिथून नीटपणे न काढता त्यांची विटंबना केली; असा दावा त्यांनी केला होता. परंतु या सर्व प्रकरणांमध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांना मारहाण करायला सुरुवात केली असा आरोप आहे.
Shiv Sena Shakha demolition Case: पालिका अधिकाऱ्याला मारहाण प्रकरण; अनिल परब यांना 4 जुलैपर्यंत दिलासा - Anil Parab bail
वांद्रे पूर्व येथील पालिका अधिकाऱ्याला मारहाण प्रकरणी माजी मंत्री अनिल परब यांच्या अटकेची धाकधूक वाढली आहे. त्यांनी अटक टाळण्यासाठी जामीन अर्ज केला, मात्र न्यायाधीश सुट्टी आहेत. अनिल परब यांच्यासह इतर आरोपी शिवसैनिकांवर अटकेची टांगती तलवार होती. जामीनासाठी दुसर्या कोर्टापुढे दाद मागितली. दुसऱ्या कोर्टाने जामीन 4 जुलैपर्यंत दिलासा दिला आहे.

शासकीय कामकाजात अडथळा : पालिका अधिकाऱ्यांकडून या चार कार्यकर्त्यांनी शासकीय कामकाजात अडथळा आणला, अशा प्रकारचा गुन्हा वाकोला पोलीस ठाणे या ठिकाणी दाखल केलेला आहे. पोलिसांनी त्या चार कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले होते. परंतु, मुंबई सत्र न्यायालयामध्ये त्यांच्या संदर्भात ठाकरे गटाकडून तातडीने खटला दाखल करण्यात आला. त्यांना न्यायालयीन कोठडी मिळावी, अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे सत्र न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी दिलेली आहे. अनिल परब यांनी या चारही कार्यकर्त्यांना जामीन मिळावा, यासाठी तातडीचा अर्ज केला आहे.
हेही वाचा :