महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shiv Sena History : शिवसेनेतील स्थापना ते पक्षातील आतापर्यंतची बंड; वाचा सविस्तर इतिहास - शिवसेना बंड

जून 2022 मध्ये शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर मविआ सरकार कोसळून शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह त्यांच्या गटाने शिवसेना पक्षाच्या नाव व धनुष्यबाण चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाच्या निकालानुसार शिवसेना पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या ताब्यात आला आहे. शिवसेनेच्या स्थापनेपासून आतापर्यंत अनेक बंड झाली. तर जाणून घेऊयात शिवसेनेचा आतापर्यंतचा इतिहास.

Shiv Sena History
शिवसेनेचा लेखाजोखा

By

Published : Feb 21, 2023, 11:00 PM IST

मुंबई: राज्यातील राजकीय इतिहासात जून 2022 मध्ये अभूतपूर्व सत्ताबदल घडून आला. महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये शिवसेनेतील तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदेंसह 40 आमदारांनी बंड पुकारले आणि शिवसेनेत मोठी फूट पडली. बंडानंतर महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. दरम्यान, शिंदे गटाने बंड पुकारल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह 40 आमदार तसेच काही खासदारांसह त्यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे शिवसेनेच्या नाव आणि चिन्हावर दावा केला. निवडणूक आयोगाच्या निर्णयानुसार शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाला मिळाले आहे. तर जाणून घेऊयात आतापर्यंतचा शिवसेनेचा लेखाजोखा.

शिवसेना पक्षाची स्थापना: बाळासाहेब ठाकरे यांनी 19 जून 1966 रोजी शिवसेना या पक्षाची स्थापना करण्यात आली. मुंबईमध्ये मराठी माणसांवर होणारा अन्याय-अत्याचाराच्या विरोधात तसेच हिंदुत्ववाद शिवसेना पक्षाच्या स्थापनेचा उद्देश होता. बाळासाहेब ठाकरे यांनी 1989 साली प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखाली भाजपसोबत युती केली. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात पहिल्यांदाच 1995 साली युतीचे सरकार अस्तित्वात आले. या युतीच्या सरकारात शिवसेनेचे मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रपद देण्यात आले. 1995 सालापासूनची युती महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2014 मध्ये तुटली आणि निवडणूक निकालानंतर पुन्हा युती झाली.

शिवसेनेचा लेखाजोखा

युतीची तुटली अन् मविआ सत्तेत: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 मध्ये भाजप व शिवसेनेसह काही पक्षांना सोबत घेत महायुती म्हणून निवडणूक लढवली गेली. या महायुतीत भाजपला अधिक जागा मिळाल्या तर शिवसेना राज्यात दुसरा क्रमांकाचा पक्ष म्हणून राहिला. 2019 साली लोकसभा निवडणूकीत शिवसेनेचे 18 खासदार तर विधानसभा निवडणूकीत आमदार निवडणडून आले. विधानसभा निवडणूक निकालानंतर मुख्यमंत्रीपदावरून वाद झाला अन् शिवसेनेने भाजपसोबतची महायुती तोडली. आणि उद्धव ठाकरे यांनी कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला पाठिंबा देत महाविकास आघाडी सरकारची स्थापना केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये उद्धव ठाकरे यांनी राज्याचे 19 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

शिवसेनेचा लेखाजोखा

शिंदे गटाचे बंड: विधान परिषदच्या निवडणूक निकालानंतर शिवसेनेचे तत्कालीन मंत्री एकनाथ शिंदे अचानक संपर्काच्या बाहेर गेले. एकनाथ शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह गुजरातच्या सुरतमध्ये ली मेरिडियन हॉटेलमध्ये दाखल झाले, बदलत्या राजकीय घडामोडींमध्ये पहिल्यांदा याठिकाणी एकनाथ शिंदे यांनी शक्तिप्रदर्शन केले. यानंतर शिंदे आपल्या समर्थक आमदारांसह सुरतहून गुवाहाटीला गेले. शिंदे गटाचे आमदार सुरतमध्ये गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तत्कालीन शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी आपल्या सर्व आमदारांची बैठक बोलावली होती. पण या बैठकीत 10 ते 12 आमदार अनुपस्थित आढळून आले. ठाकरे यांच्याकडून शिंदे यांना शिवसेनेचे मुख्य प्रतोद पदावरून हटवण्यात आले. शिंदेंविरुद्ध कारवाईचा इशारा देत शिवसेनेने अजय चौधरी यांना गटनेतेपदी नियुक्त केले तर सुनील प्रभू यांची नियुक्ती प्रतोद म्हणून करण्यात आली. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी याला प्रत्युत्तर देत भरत गोगावले यांची प्रतोद म्हणून नियुक्ती केली.

शिवसेनेने आतार्यंत काय गमावले?

शिंदे गट व ठाकरे गट: जून महिन्याच्या अखेरीस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचा समावेश महाविकास आघाडीचे सरकार एकनाथ शिंदे आणि इतर 39 आमदारांनी पक्षाच्या नेतृत्वाविरुद्ध बंड केल्यानंतर कोसळले. यातूनच पुढे शिवसेनेत एक गट उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली आणि दुसरा एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विभागला गेला. भारतातील पक्षांतर विरोधी कायद्यानुसार पक्षातील एकूण आमदारांच्या संख्येपैकी दोन तृतीयांश संख्येचा पाठिंबा आवश्यक असतो. त्यानुसार एकनाथ शिंदे यांना 37 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा मिळाल्यामुळे 23 जून रोजी एकनाथ शिंदे यांना 37 आमदारांनी शिवसेना विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषित केले.

आतापर्यंत झालेले बंड:शिवसेना पक्षात सुरूवातीला छगन भुजबळ यांनी बंड पुकारले होते. भुजबळांनी 90 च्या दशकात हीच शिवसेना आडवी करून काँग्रेससोबत घरोबा केला होता. शिवसेनेचे कंबरडे मोडण्याचे खरे काम तेव्हाच झाले होते. ठाण्यातल्याच फुटीर खोपकर हत्येनंतर शिवसेनेत बंड होत नव्हते. खोपकर होण्याची भीती दाखविली जायची तिही या बंडाने संपविली होती. त्यानंतर आणखीन 3 मोठ्या माणसांची बंड तिही शिवसेनेतली महाराष्ट्राने पाहिली. त्यात गणेश नाईक, नारायण राणे यांच्या बंडापेक्षा राज ठाकरेंचे बंड मोठे मानले जात होते. कारण त्यावेळी राज ठाकरे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात थेट फुट पडली होती. पण शिंदे गटाने केलेल्या बंडामुळे शिवसेनाचा पार चेहराच बदलला आहे.

शिवसेनेचा लेखाजोखा

शिवसेना पक्षाचा न्यायालयातील वाद: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर शिवसेना हा राजकीय पक्ष व धनुष्यबाण या निवडणूक चिन्हावर दाव्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतली होती. शिंदे यांनी आमच्याकडे 40 आमदार आणि 13 खासदार असून चिन्ह आम्हालाच मिळेल असा दावा शिंदे गटाने केला होता. तर पक्षातून लोक बाहेर पडले ही कल्पना आहे, असा युक्तीवाद उद्धव ठाकरे गटाकडून करण्यात आला. निवडणूक आयोगाने दोन्ही गटाच्या बाजू ऐकून राजकीय इतिहासातील ऐतिहासिक निर्णय दिला. निवडणूक आयागाने 17 फेब्रुवारी 2023 रोजी शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिले आहे.

हेही वाचा:Look Back 2022: महाराष्ट्राच्या राजकारणामधले ऐतिहासिक बंड! जगाने घेतली दखल;वाचा सविस्तर

ABOUT THE AUTHOR

...view details