महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण; आज भारत खऱ्या अर्थाने पूर्णपणे स्वतंत्र झाला - उद्धव ठाकरे - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे

जम्मू-काश्मिरमधील कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव आज राज्यसभेत ठेवण्यात आला. त्याबद्दल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारचे अभिनंदन केले.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे

By

Published : Aug 5, 2019, 2:04 PM IST

Updated : Aug 5, 2019, 3:09 PM IST

मुंबई - सरकारने पोलादीपणे जम्मू-काश्मीरबद्दल निर्यण घेतला आहे. आज भारत खऱ्या अर्थाने पूर्णपणे स्वतंत्र झाला आहे. त्यामुळे सर्वांनी राजकीय घोडे बाजूला ठेवून सर्वांनी आनंदोत्सव साजरा करावा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले. आज जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा प्रस्ताव राज्यसभेत ठेवण्यात आला. याच पार्श्वभूमीवर ते पत्रकारांशी बोलत होते.

बाळासाहेबांचे स्वप्न पूर्ण; आज भारत खऱ्या अर्थाने पूर्णपणे स्वतंत्र्य झाला - उद्धव ठाकरे

काश्मीरमधून ३७० कलम हटवण्यात यावे, असे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न होते. ते आज एवढ्या दिवसानंतर पूर्ण झाले आहे. सर्वांनी देशाच्या एकसंघपणाचा विचार करावा. मात्र, या निर्यणयाला विरोध करणाऱ्यांचा सरकार बंदोबस्त करणार असल्याचे उद्धव म्हणाले. तसेच जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याच्या निर्णयाबाबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह अभिनंदन केले.

भारत-पाकिस्तानचा मुद्दा सोडवण्यासाठी ट्रम्प यांनी मध्यस्थी करावी, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले होते. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपल्या देशाचा प्रश्न सोडवण्यासाठी आपले सरकार समर्थ आहे. त्यामध्ये इतरांनी नाक खुपसण्याची गरज नाही, असा टोला लगावला. याशिवाय सेनाभवनात मोठा जल्लोष साजरा करण्यात आला.

Last Updated : Aug 5, 2019, 3:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details