मुंबई -राज्यामध्ये महापुरुषाचा सातत्याने होणारा अपमान, राज्यातून बाहेर जाणारे उद्योगधंदे बेरोजगारी आणि महाराष्ट्र कर्नाटक सीमा ( Maharashtra Karnataka Border Dispute ) भागात मराठी बांधवांवर होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात उद्या महाराष्ट्र प्रेमींचा महामोर्चा असणार आहे. संयुक्त लढ्यात ज्याप्रमाणे मुंबई, दिल्लीमध्ये मोर्चे निघत होते, त्याप्रमाणे उद्याचा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा असेल, असे मत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Shiv Sena Mp Sanjay Raut ) यांनी मुंबईत पत्रकारांशी संवाद साधताना काढले आहेत. केवळ महाविकास आघाडीचा ( MVA Maha Morcha In Mumbai ) हा मोर्चा नसून जे कोणी महाराष्ट्र प्रेमी आहेत, त्या सर्वांनी या मोर्चात सामील व्हावे असे आवाहनही संजय राऊत यांनी यावेळी केले.
भाजपचा मोर्चा म्हणजे अपशकूनमुंबईतील उद्या होणारा मोर्चा हा महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा आहे. मात्र आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ( Doctor Babasaheb Ambedkar ) यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा आधार घेत आपल्या विरोधात काढण्यात येणारा मोर्चा भाजपचा ( BJP Protest In Mumbai ) उद्याच्या मोर्चाला अपशकून असल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. बाबासाहेब आंबेडकर ( Doctor Babasaheb Ambedkar ) हे महाराष्ट्राचे सुपुत्र होते. त्यांची पाळमुळे महाराष्ट्राशी घट्ट आहेत. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकर यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य करून त्यांचा अपमान सुरू आहे. यासोबतच कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर ( Maharashtra Karnataka Border Dispute ) मराठी बांधवांना त्रास दिला जातो. याबाबत भारतीय जनता पक्षाचे नेते चकार शब्दही काढत नाहीत. मूग गिळून गप्प बसले आहेत. मात्र अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्ष ( Bharatiya Janata Party ) या मुद्द्याचे राजकारण करत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही. भारतीय जनता पक्षाला जोड्याने मारण्याचे काम महाराष्ट्राची जनता करेल आणि या मुद्द्यावर राजकारण करणाऱ्या भारतीय जनता पक्षाचा अंत होईल, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे.