मुंबई- महाविकास आघाडी सरकारच्या स्थिरतेबाबत कोणी बातम्यांचा धुरळा उडवत असेल तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. आमचे सरकार मजबूत आहे. चिंता नसावी, असे टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी विरोधकांना लगावला आहे. सोमवारी रात्री उशिरा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात मातोश्रीवर दीड तास चर्चा झाली. या चर्चेनंतर राऊत यांनी ट्विट करत हा टोला लगावला आहे.
संजय राऊत त्यांच्या ट्विटमध्ये म्हणतात, 'शरद पवार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची काल (सोमवार) संध्याकाळी मातोश्रीवर भेट झाली. दोन्ही नेत्यांमध्ये दीड तास चर्चा झाली. कोणी सरकारच्या स्थिरतेबाबत बातम्यांचा धुरळा उडवत असतील तर ती निव्वळ पोटदुखी समजावी. सरकार मजबूत आहे. चिंता नसावी.'
सोमवारी शरद पवार यांच्यासह काँग्रेस नेते प्रफुल्ल पटेल यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. भेटीनंतर प्रफुल्ल पटेल यांनी ही सदिच्छा भेट असल्याचे सांगितले. पवार आणि पटेल यांच्या भेटीनंतर काही तासातच माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राज्यपालांच्या भेटीसाठी राजभवन गाठले.