मुंबई - पूजा चव्हाण मृत्यू प्रकरणात वाढत्या दबावानंतर वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे राजीनामा दिला. या रिक्त झालेल्या पदासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी लॉबिंग सुरू केले आहे. आमदार रविंद्र वायकर, संजय रायमुलकर, गोपीकिशन बाजोरिया यांची नावे यात आघाडीवर आहेत. गेल्यावेळी रवींद्र वायकर नाराज होते. मात्र, आता मंत्रिपदासाठी त्यांनीही उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे जोरदार प्रयत्न सुरू केल्याचे बोलले जात आहे. तर विदर्भाचे दिग्गज नेते सलग तीन वेळचे मेहेकरचे आमदार संजय रायमुलकर यांचेही नाव चर्चेत आहे. त्यामुळे मंत्रिपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मंत्रिपदासाठी लॉबिंग -
पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी वनमंत्री संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला. विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला राजीनामा दिल्याने मुख्यमंत्र्यांनी सध्या हे खाते त्यांच्याकडे ठेवले आहे. मात्र, विरोधकांच्या प्रश्नांना मुख्यमंत्री किंवा राज्य मंत्र्यांकडून उत्तरे दिली जाईल. असे असले तरी शिवसेनेच्या काही नेत्यांनी या पदासाठी लॉबिंग करण्यास सुरुवात केली आहे.
लॉटरी कोणाला लागणार -