महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कंगना येथे आल्यावर तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाही', शिवसेना आमदाराची धमकी

आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाला ट्विटरवरून थेट धमकी दिली आहे. ते म्हणाले की, कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती येथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत.

By

Published : Sep 4, 2020, 3:54 PM IST

Updated : Sep 4, 2020, 5:29 PM IST

अभिनेत्री कंगना
अभिनेत्री कंगना

मुंबई -अभिनेत्री कंगना रणौतने मुंबई पोलिसांवर केलेल्या वक्तव्यानंतर खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर टीका केली होती. त्यावर कंगनाने संजय राऊत आपल्याला उघडपणे मुंबईत येऊ न देण्याची धमकी देत आहेत, असा आरोप करत मुंबईची तुलना पीओकेशी (पाकव्याप्त काश्मीर) केली. त्यावरून तिच्यावर अनेकजण टीका करत आहेत. काँग्रेस, मनसे, भाजप आणि शिवसेनेकडून तिच्यावर टीका होत आहे.

मुंबई

आता शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी कंगनाला ट्विटरवरून थेट धमकी दिली आहे. ते म्हणाले की, कंगनाला खासदार संजय राऊत यांनी सौम्य शब्दांत समज दिली. ती इथे आली तर आमच्या रणरागिणी तिचे थोबाड फोडल्याशिवाय राहणार नाहीत. उद्योजक व सेलेब्रिटी घडवणाऱ्या मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणाऱ्या कंगनावर देशद्रोही म्हणून गुन्हा दाखल करण्याची मी गृहमंत्र्यांना मागणी करणार आहे असं त्यांनी सांगितले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत सध्या दररोज एक ट्विट करून खळबळ उडवून देत आहे. काल तिने शिवसेना आपल्याला मुंबईत येऊ नकोस अशी धमकी देत असल्याचा आरोप केला होता. यानंतर आज तिने अमुक-अमुक तारखेला आपण मुंबईत येत असून ज्याच्यांत हिम्मत असेल त्याने आपल्याला रोखून दाखवावं, असे म्हणत शिवसेनेला थेट आव्हान दिले आहे.

हेही वाचा -मी पोकळ धमक्या देत नाही, थेट अ‌ॅक्शन करतो; संजय राऊतांचे कंगनाला शिवसेना स्टाईल प्रत्युत्तर

सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात दररोज खळबळजनक खुलासे करणाऱ्या कंगणाने यावेळी शिवसेनेला लक्ष्य करायला सुरुवात केली आहे. काल शिवसेना नेते संजय राऊत आपल्याला मुंबईत पाय ठेवून नकोस सांगत धमकावत असल्याचं ट्विट तिने केलं होतं. याच ट्विटमध्ये तिने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. मात्र, आज यापुढे जाऊन या तारखेला आपण मुंबईत येत असून शक्य असेल तर आपल्याला रोखून दाखवावं अस सांगत शिवसेनेला उघड उघड आव्हान दिले आहे.

Last Updated : Sep 4, 2020, 5:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details