मुंबई - ढोल ताशांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत आज युवासेना प्रमुख व शिवसेना नेते आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या सोबत वडील उद्धवठाकरे यांच्यासह आई रश्मी, भाऊ तेजस यांच्यासह दिवाकर रावते, अरविंद सावंत, निलम गोऱ्हे, अनिल परब इत्यादी शिवसेनेचे वरिष्ठ नेते होते.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हेही वाचा -आदित्यला शिवसेनेवर लादला नाही - उध्दव ठाकरे यांचे स्पष्टीकरण
उमेदवारी अर्ज दाखल करायला जाण्यापूर्वी आदित्य ठाकरेंनी दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत जाऊन त्यांच्या फोटोला नमस्कार केला. याचा फोटो त्यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
ठाकरे घराण्यातील पहिला ठाकरे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्यामुळे सर्वांचे लक्ष त्याकडे लागून राहिले आहे. युवासेना दुचाकीवरून जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंना पाठिंबा दिला.
उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे कार्यालयात दाखल वरळीतील शाखा क्रमांक 198 येथील शिवालय सेनापती बापट मार्ग, लोअर परेल येथून आदित्य ठाकरेंच्या रॅलीला सुरुवात होणार आहे. सेनापती बापट मार्ग ते गणपतराव कदम मार्ग ते वरळी नाका ते डॉ.ई मोजेस रोड इथेपर्यंत जाऊन रॅली समाप्त झाली. संध्याकाळी 5 वाजता वरळी नाका येथे आदित्य ठाकरे यांच्या मुख्य निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.
हेही वाचा -पाठीत खंजीर खुपसला तरी पक्षनिष्ठा कायम, मेधा कुलकर्णी झाल्या भावनिक