मुंबई -पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. पश्चिम बंगालमधील मुख्य लढत ही ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षामध्ये असली तरी बाकी राजकीय पक्ष देखील आपले नशीब आजमवणार आहेत. महाराष्ट्रात असलेला राजकीय दबदबा निर्माण करण्यासाठी शिवसेना देखील बंगालच्या विधानसभा निवडणुका लढवणार आहे, अशी माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
बिहार विधानसभेत अपयश मिळाल्यानंतर शिवसेना आणखी एक राज्यात आपले नशीब आजमवण्यासाठी तयार झाली आहे. शिवसेनेने याआधीच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. पण त्याबाबतचा अंतिम निर्णय होत नव्हता. अखेर रविवारी संजय राऊत यांनी शिवसेना पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले.
'बहुप्रतीक्षित अपडेट्स घेऊन आलोय-
जय हिंद.. जय बांगला! शिवसेना लढवणार बंगालची निवडणूक
शिवसेनेने याआधीच पश्चिम बंगालमध्ये निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. पण त्याबाबतचा अंतिम निर्णय होत नव्हता. अखेर रविवारी संजय राऊत यांनी शिवसेना पश्चिम बंगालच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे अधिकृतरित्या जाहीर केले.
शिवसेना लढवणार बंगालची निवडणूक
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेत पश्चिम बंगालच्या निवडणुका लढण्याचा निर्णय शिवसेनेने घेतला आहे. आम्ही लवकरच कोलकाता येथे दाखल होत आहोत. जय हिंद, जय बांगला!' असं राऊत यांनी आपल्या ट्वीटमध्ये नमूद केलं आहे. 'जय बांगला' ही घोषणा राऊत यांनी बंगाली भाषेत नमूद केली असून शिवसेना पूर्ण ताकदीने ही निवडणूक लढेल, असेच संकेत याद्वारे मिळाले आहेत.
Last Updated : Jan 18, 2021, 6:27 AM IST