महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Bjp Vs Sanjay Raut : हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वात प्रथम शिवसेनेने निवडणूक लढवली - संजय राऊत

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी भाजपवर केलेल्या टीके नंतर महाराष्ट्रातील राजकिय वातावरण चांगलेच तापले आहे. भाजपच्या अनेक नेते पदाधिकाऱ्यांनी त्या टीकेला उत्तर दिल्या नंतर वाद वाढला आहे. शिवसेना नेते संजय राऊत (Shiv Sena leader Sanjay Raut) यांनी आज या सगळ्यांचा समाचार घेताना हिंदुत्वाच्या मुद्यावर सर्वात प्रथम शिवसेनेने निवडणूक लढवल्याची (Shiv Sena first contested elections on the issue of Hindutva ) आठवण करुन दिली आहे.

Sanjay Raut
संजय राऊत

By

Published : Jan 25, 2022, 10:48 AM IST

Updated : Jan 25, 2022, 11:58 AM IST

मुंबई:हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना- भाजपमध्ये जुंपली असताना शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजपमधील निष्ठावंताच्या कुटुंबावर होणाऱ्या अन्यायाला वाचा आज फोडली आहे. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर पर्रीकर यांच्या कुटुंबाला भाजपने अंधारात ठेवल्याचा घणाघात राऊत यांनी केला.
बेगडी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. भाजपच्या जन्माअगोदर शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्यावर लढली असा दावा ही केला. यावरून जोरदार राजकारण रंगले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावर सर्वात प्रथम शिवसेनेचे निवडणूक लढवली. आता नवं हिंदू आले आहेत. भाजपने त्यांच्या इतिहासाची काही पाने फाडली आहेत. मात्र वेळोवेळी आम्ही त्यांना माहिती देत राहू, असा टोला फडणवीस यांना लगावला.

संजय राऊत

राऊत म्हणाले की, मी कुणावर टिका केली नाही. विलेपार्लेत विधानसभा निवडणुक झाली. बाळासाहेबांनी ओपन प्रचार केला. त्या निवडणूकीत काँग्रेस, भाजप दोघेही होते. आम्ही जिंकलो त्यानंतर सगळ्यांना झटका बसला होता. त्यावेळी ही हिंदूत्व वाढेल, निवडणुक या मुद्दांवर जिंकू शकतो, आम्ही एकत्र निवडणुक लढू शकतो असा प्रस्ताव प्रमोद महाजन, अटल बिहारी वाजपेयी यांनी मांडला होता. आताच्या नवहिंदूत्ववादी भाजप नेत्यांना सध्या माहीती नाही, असा चिमटा काढला.

व्यक्तीगत प्रमोद महाजनांवर टिका नाही, ते कार्टून आर के लक्ष्मण यांनी काढले होते. भाजपच्या काही लोकांनी वक्तव्य केले आणि त्याकाळचा सत्य दाखवण्यासाठी आर के लक्ष्मण यांचे व्यंगचित्र ट्विट केले. पूनम महाजन यांना अस्वस्थ व्हायची गरज नाही, अजूनही ते कार्टून स्मरणात आहे. तसेच पर्रिकर, महाजन यांच्या कुटूंबियांशी आमचे नात घनिष्ठ आहे. भाजपकडून या नेत्यांच्या परिवाराला अंधारात ठेवले आहे, असे ही राऊत म्हणाले.

उत्तर प्रदेशात आम्ही यादी जाहीर केली आहेत पन्नास जागांवर ते आम्ही निवडणूक लढवणार आहोत. भाजपला रोखायचे असेल तर एकत्र निवडणुका लढवाव्या लागतील, असे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात म्हणाले होते. हाच धागा राऊत धरला. सर्वांनी एकत्र घेऊन दिल्ली काबीज करू. असेही यांनी स्पष्ट केले.

पाच राज्यात निवडणुका होतं आहेत. येथे मतदार संभ्रमात आहे. आपण दिलेल मत नेमक त्याच पक्षाला जात आहे का, या बद्दल भिती आणि संशय आहे. ते दुर व्हायला पाहिजे
पुन्हा एकदा बँलेट पेपरवर निवडणुक व्हायला पाहिजेत, असेही संजय राऊत म्हणाले. तसेच गोव्यात आदीत्य ठाकरे जाणार असून, कोविड नियमांचं पालन करून गोव्यात प्रचार करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.

कांग्रेस नेते यांच्या मतदारसंघातील क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचे नाव दिले जाणार आहे. भाजपने यावरून टीकेची राळ उठवली आहे. यावर संजय राऊत यांना विचारण्यात आले असता, त्यांनी बोलण्यास नकार दिला.

हेही वाचा :Poonam Mahajan Twitter : 'दोन्ही मर्दांनी हिंदुत्वसाठी युती केली होती'! पुनम महाजन यांचे ट्विट

Last Updated : Jan 25, 2022, 11:58 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details