महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आमचं ठरलंय' या वाक्याने होऊ शकतो शिवसेनेचा घात? सेनेच्या वरिष्ठ नेत्याची खंत - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सत्तेतल्या सामान वाटपात मुख्यमंत्री पदाचीही मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. तर भाजप या मागणीकडे सध्या दुर्लक्ष करत आहे. मात्र, लोकसभेत युती करताना नेमकं त्यावेळी ठरलय काय? हे उद्धव साहेबांनी जनतेच्या समोरच मांडायला हवे होते, अशी खंतही या नेत्याने व्यक्त केली आहे.

सेना-भाजप

By

Published : Nov 2, 2019, 7:06 PM IST

Updated : Nov 2, 2019, 7:31 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीत महायुतीची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वेळोवेळी केवळ 'आमचं ठरलंय' हेच विधान करून एकार्थाने जनतेला गप्प करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 'आमचं ठरलंय' या वाक्यानेच आता शिवसेनेचा घात केला असून, उद्धव साहेबांनी फसव्या भाजपवर विश्वास टाकला असल्याचे शिवसेनेच्या एक वरिष्ठ नेत्याने सांगितले.

प्रतिनिधी सचिन गडहिरे माहिती देताना

सत्तेतल्या समान वाटपात मुख्यमंत्री पदाचीही मागणी शिवसेनेने लावून धरली आहे. तर भाजप या मागणीकडे सध्या दुर्लक्ष करत आहे. मात्र, लोकसभेत युती करताना नेमकं त्यावेळी ठरलय काय? हे उद्धव साहेबांनी जनतेच्या समोरच मांडायला हवे होते, अशी खंतही या नेत्याने व्यक्त केली आहे.

हेही वाचा - राष्ट्रपती राजवट ही संविधानातील कायदेशीर प्रक्रिया - आमदार राम कदम

महाराष्ट्राच्या विधानसभेचा निकाल लागून आठवडा लोटला असला, तरी महायुतीत सरकार स्थापनेबाबत एकमत होत नाही. भाजपही मुख्यमंत्री पद सोडणार नसल्याचे भाजपचे नेते खासगीत सांगत आहेत. तर अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीही चर्चा लोकसभेच्या वेळी झाली नसल्याचे थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच स्पष्ट केले आहे. जर सत्तेच्या समान वाटपात अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्री पद लोकसभेच्या वेळीच ठरले असेल, तर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याचवेळी जनतेसमोर हे मांडायला हवे होते. जनतेसमोरच या मुद्यावर युती झाली असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले असते, तर ही संघर्षाची वेळ आली नसती. तसेच भाजपलाही नियंत्रणात ठेवता आले असते.

शिवसेनेला उपमुख्यमंत्री पद दिल्यास सेनेच्या पारड्यात महत्वाची खाती देता कामा नयेत. महसूल, गृह आणि नगर विकास ही खाती सेनेला देण्यास भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचा तीव्र विरोध आहे. गृहनिर्माण, जलसंपदा किंवा सार्वजनिक बांधकाम ही खाती सेनेला देण्यास हरकत नाही. याच अटीवर सेनेसोबत युती करावी, अशी भाजपची धारणा आहे. मात्र, शिवसेनेला थेट गृहमंत्री पद दिल्यास शिवसेना सत्तेत सामील होऊ शकते, अशी शक्यताही सेनेच्या वरिष्ठ नेत्याने वर्तवली आहे.

हेही वाचा - हीच ती वेळ..! शिवसेनेला छगन भुजबळांनी दिला 'हा' सल्ला

लोकसभेच्या वेळी महायुतीची घोषणा करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या समोरच आगामी काळात सत्तेत समान वाटा देण्याच्या बोलीवर महायुतीवर शिक्कामोर्तब असल्याचे जाहीर केले होते. त्या वक्तव्याची क्लिपही समाज माध्यमांत व्हायरल होत आहे. पण, त्यावेळी नेमकं काय ठरलय या बाबतीतही उद्धव ठाकरेंनी भूमिका व्यक्त केली असती, तर आज ही वेळच आली नसती, असेही या नेत्याने सांगितले आहे.

Last Updated : Nov 2, 2019, 7:31 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details