मुंबई : अंग प्रदर्शन केल्याप्रकरणी चित्रा वाघ यांनी (BJP Pradesh Mahila Morcha President chitra Wagh) उर्फी जावेदला मारण्याची भाषा केली. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून चित्रा वाघ यांचे कान उपटले. उर्फी जावेदच्या अंगप्रदर्शनावर आक्षेप घेण्यापूर्वी कंगना राणावत, केतकी चितळे आणि अमृता फडणवीस यांचे छोट्या कपड्यातील फोटो शेअर करत यांना मारहाण करणार का, थेट असा सवाल विचारत आरसा (Sushma Andhare criticized Chitra Wagh) दाखवला. प्रसिद्धीच्या झोतात आणि चर्चेत राहण्यासाठी अजून किती खालची पातळी गाठणार, अशा शब्दांत ही त्यांनी चित्रा ( Uorfi Javed Chitra wagh controversy ) वाघ यांना चांगलेच फटकारले आहे.
Sushma Andhare criticized Chitra Wagh : कंगना, केतकी आणि अमृता फडणवीस यांना मारणार का ? सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना सवाल
भाजपा प्रदेश महिला मोर्चा अध्यक्ष चित्रा वाघ यांनी किळसवाणे अंगप्रदर्शन करणाऱ्या मॉडेल उर्फी जावेदवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी (BJP Chitra Wagh over actress Uorfi Javed ) केली. त्यांच्या या मागणीवर आता शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी हल्लाबोल केला (Sushma Andhare criticized Chitra Wagh) आहे. प्रसिद्ध झोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल, असा सवाल त्यांनी चित्रा वाघ यांना विचारला (Uorfi Javed Chitra wagh controversy) आहे.
अमृता फडणवीस, केतकी आणि कंगना :उपनेत्या सुषमा अंधारे म्हणाल्या की, मी साडी नेसते. मला साडी नेसायला आवडते. कारण मला स्वतःला त्यात जास्त कम्फर्टेबल आणि कॉन्फिडंट (Urfi Javed Chitra wagh controversy) वाटते. भारताच्या बाहेर गेल्यानंतरही माझा पेहराव हा बहुतांश साडीच असतो, फार फार तर सलवार सूट असतो. म्हणून इतरांनी माझ्यासारखाच पेहराव करावा, असा माझा अट्टाहास अजिबात नसतो. ज्याला ज्या पेहरावांमध्ये कम्फर्टेबल वाटते तो करतो. किंवा प्रत्येकाची आपापल्या व्यवसाय क्षेत्राची गरज सुद्धा असते. उदाहरणार्थ टेनिस खेळणारी महिला साडी नेसून टेनिस खेळू शकणार नाही. अन् मी शिक्षिका आहे, तर माझ्या शिक्षकी पेशाला साजेसा पेहराव माझा असावा. मात्र, अंग प्रदर्शन चूक की बरोबर या मुद्द्यावर नंतर कधीतरी बोलू या. पण जर पेहराव हा मुद्दा घेऊन एखाद्याला मारण्याची केली जात असेल तर ती जात धर्म किंवा विचारधारा बघून का केली जावी ? असा प्रश्न अंधारे यांनी विचारात उर्फी जावेद हिची पाठराखण केली (BJP Chitra Wagh over actress Uorfi Javed) आहे.
केवळ प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी :त्या म्हणाल्या (Shiv Sena deputy leader Sushma Andhare) की, उर्फी जावेद सारख्या अल्पसंख्याक समुदायातील महिलेला मारहाण करण्याची भाषा हा अधिकार तुम्हाला कोणी दिला ? तसेच उर्फी जावेदच्या वेशभूषेवरच तुमचे आक्षेप असतील तर असेच आक्षेप तुम्ही कंगना राणावत, केतकी चितळे किंवा अमृता फडणवीस यांच्या वेशभूषेवर घेऊ शकाल का ? किंवा केतकी चितळे, कंगना राणावत आणि अमृता फडणवीस यांना मारहाणीची भाषा कराल का? असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला आहे. तसेच नंगटपणा हा कपड्यांपेक्षा विचार आणि भाषेमध्ये जास्त असतो. प्रसिद्ध झोतात, चर्चेत राहण्यासाठी जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित प्रश्न सोडून किती भरकट जाल, असा जाब विचारला आहे. हा सत्तेचा माज, अर्रोगंटपणा असल्याची टीकाही अंधारे यांनी केली (Sushma Andhare criticized) आहे.