महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Dasara Melava Inside Story : दसरा मेळाव्याकरिता गर्दी गोळा करणं शक्य झालं नसल्यानं शिंदे गटाला ११० बस कराव्या लागल्या रद्द, वाचा सविस्तर - एसटी कर्मचारी कामगार संघटनेचे नेते श्रीरंग बर्गे

Buses Cancelled On Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटानं मुंबईतील आझाद मैदानावर आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून कार्यकर्ते बोलावण्यात आले होते. या कार्यकर्त्यांसाठी ठिकठिकाणी एसटी बसेसदेखील बुक करण्यात आल्या होत्या. मात्र, कार्यकर्ते किंवा एसटीचे कर्मचारीही या गाड्यांकडं न फिरकल्यानं अनेक गाड्या रद्द कराव्या लागल्या. दरम्यान, यावरुन सदावर्ते सारख्या विषारी माणसाच्या नादाला लागल्यामुळं ही अवस्था झाल्याचा दावा एसटी कॉँग्रेस कर्मचारी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. तर आपण रिकाम्या बसेस बघू नका मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम पाहा, अशी सारवासारव शिवसेनेच्या (शिंदे गट) प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी केली आहे.

Buses Cancelled On Dasara Melava
दसरा मेळावा आणि आरोप-प्रत्यारोप

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 26, 2023, 11:39 AM IST

Updated : Oct 26, 2023, 1:07 PM IST

दसरा मेळाव्यात शिंदे गटाचा बोजवारा उडाला का?

मुंबई Buses Cancelled On Dasara Melava : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेनं (शिंदे गट) मुंबईतील आझाद मैदानावर भव्य दसरा मेळाव्याचं आयोजन केलं. या दसरा मेळाव्यासाठी राज्यभरातून शिंदे समर्थक आणि कार्यकर्ते उपस्थित राहिले. मात्र, अनेक आगारांमध्ये या बुक केलेल्या बसेसकडं कार्यकर्ते अथवा समर्थक फिरलेच नाहीत. इतकंच काय तर गुणरत्न सदावर्ते यांच्याकडं एसटी कर्मचारी यांना सभेसाठी घेऊन येण्याची जबाबदारी देण्यात आली होती, मात्र त्यांनाही सभेसाठी लोकं गोळा करणं शक्य झालं नाही. दरम्यान, याच पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी त्यांच्याकडं पाठ फिरवली, असा दावा एसटी कर्मचारी कामगार संघटनेचे नेता श्रीरंग बर्गे यांनी केला आहे.



सभेसाठी सुट्टी देण्याचे आदेश : शिंदे गटाच्या सभेसाठी येणाऱ्या कर्मचारी अथवा त्यांच्या नातेवाईकांची व्यवस्था करावी, तसंच कर्मचाऱ्यांच्या कामांचं नियोजन करावं अथवा त्यांना सुट्टी द्यावी अशा सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, तरीदेखील कुणीही या गाड्यांकडं फिरकलं नाही. परिणामी विविध डेपोमध्ये बुक करण्यात आलेल्या २०० गाड्यांपैकी एकशे दहा गाड्या रद्द करण्यात आल्या. तर उरलेल्या गाड्यांमधूनही मोजकेच लोक मुंबईकडे रवाना झाले. त्यामुळं या सभेचा पूर्ण बोजवारा उडाल्याचा दावा बर्गे यांनी केला.



जरांगे पाटलांमुळं दोन्ही सभांना फटका : मराठा आरक्षणासाठी मैदानात उतरलेले नेते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामुळं मराठा समाजातील आणि कुणबी समाजातील अनेक समर्थक एकनाथ शिंदे यांच्या तसंच शिवसेना पक्षप्रमुख (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांच्याही मेळाव्यांकडे फिरकले नाहीत, परिणामी त्याचा फटका या मेळाव्यांना बसल्याचा दावाही बर्गे यांनी केलाय.



मुख्यमंत्र्यांचे काम पहा ,बसेस रद्द झाल्याचं काय पाहता : दरम्यान, या संदर्भात शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या मनिषा कायंदे यांना विचारण्यात आलं असता त्या म्हणाल्या की, सभेला किती बसेस बुक केल्या होत्या? किती आल्या? किती रद्द झाल्या? याची नेमकी माहिती माझ्याकडे नाही. मात्र, किती बसेस रद्द झाल्या हे पाहण्यापेक्षा मुख्यमंत्री काय काम करतात?, लोकांचे प्रश्न कसे सोडवतात, महिलांसाठी आणि वयोवृद्धांसाठी एसटी बसमध्ये कशी सवलत दिली आहे? याकडे लक्ष द्यायला पाहिजे असे सांगत त्यांनी एसटी बस रद्द झाल्याबाबत सारवासारव केली.

हेही वाचा -

  1. Shinde Group Dasara Melava : '५० खोक्यांचा आरोप करून आम्हालाच ५० कोटी मागता, तुम्ही निर्लज्ज...', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
  2. Uddhav Thackeray Dasara Melava : मराठा समाजावर लाठीचार्जचा आदेश देणारा डायर कोण? उद्धव ठाकरेंचा सरकारला सवाल
  3. Uddhav Thackeray Dasara Melava : आमचं सरकार आल्यावर तुम्हाला उलटं टांगू; उद्धव ठाकरेंचा पलटवार
Last Updated : Oct 26, 2023, 1:07 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details