महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

रावणाच्या लंकेत जर 'हा' निर्णय होऊ शकतो तर रामाच्या अयोध्येत का नाही, उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत जाणार आहेत. त्यानिमित्त शिवसेनेने बुरखाबंदीचा विषयाला हात घातला आहे.

उद्धव ठाकरेंचा सामन्यातून मोदींना सवाल

By

Published : May 1, 2019, 8:58 AM IST

मुंबई- शिवसेना भाजप यांच्यात युती झाली असली तरी शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मात्र भाजपला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडत नाही. श्रीलंकेत झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर तिथे घेण्यात आलेल्या बुरखाबंदीच्या निर्णयावरून शिवसेनेने भाजपला भारतात या निर्णयाची अंमलबजावणी कधी करणार? असा सवाल सामना वृत्तपत्राच्या अग्रलेखातून केला आहे.

राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून श्रीलंकेत बुरखा घालण्यावर बंदी घालण्यात आली आहे. त्यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. रावणाच्या लंकेत जर बुरखाबंदीचा निर्णय होऊ शकतो तर रामाच्या अयोध्येत का होऊ शकत नाही, असा सवाल त्यांनी भाजपला केला आहे.

बहुपत्नी प्रथा, सक्तीच्या कुटुंबनियोजन, ट्रिपल तलाक आणि बुरखा बंदी याविरोधातही अग्रलेखात टीका करण्यात आली. कुराणचा दाखला देऊन मुस्लीम समाज कालबाह्य परंपरांचे पालन करत असून त्यातील काही गोष्टी राष्ट्रासाठी धोकादायक असल्याचे अग्रलेखात म्हटले आहे. फ्रान्स न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, ब्रिटनमध्येही बुरखाबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. आता श्रीलंकेसारख्या लहान देशानेही ते धाडस दाखवले. भारत कधी यासंबंधी निर्णय घेणार असा सवाल करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येत जाणार आहेत. त्यानिमित्त शिवसेनेने बुरखाबंदीचा विषयाला हात घातला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details