मुंबई:खा. संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की,राज्याचे पर्यावरण मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे 10 जूनला आयोध्या दौरा करतील. त्यांच्यासोबत शिवसेनेचे काही नेते सोबतच देशभरातून शिवसैनिक दौऱ्यावर जाणार आहेत. हा दौरा राजकीय नाही, श्रीरामावरील श्रद्धा आणि भक्ती मुळे आम्ही हा दौरा करत आहोत. उत्तर प्रदेशच्या जनतेने आम्हाला या दौऱ्यासाठी आमंत्रण दिले आहे. त्यामुळे दौऱ्याची पूर्ण तयारी केली जात आहे.
असली आणि नकली कोण,हे उत्तर प्रदेशची जनता ठरवेल मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील आयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यामुळे शिवसेना आणि मनसेच्या आयोध्या दौऱ्या पूर्वी केवळ महाराष्ट्रात नाही तर, तर आयोध्यमध्ये देखील राजकारण तापलेले पाहायला मिळतेय. अयोध्येत "असली आरहा है, नकली से सावधान" असे पोस्टर लावण्यात आले आहेत. मात्र हे पोस्टर कोणी लावले याबाबत शिवसेनेला कल्पना नाही. असली कोण आणि नकली कोण हे उत्तर प्रदेशची जनता ठरवेल. कोण राजकीय हेतूने अयोध्याचा दौरा करत आहे हे उत्तर प्रदेशच्या सुजाण जनतेला चांगलेच माहित आहे असा चिमटाही राऊत यांनी काढला.