मुंबई:मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे खासगी निवासस्थान असलेल्या 'मातोश्री' या निवासस्थाना समोर हनुमान चालीसा वाचणार असल्याचे अमरावतीच्या खासदार नवनित राणा आणि आमदार रवी राणा यांनी जाहीर केले. तेव्हा पासून हा वाद चिघळत चालला आहे. मातोश्री भोवती शिवसैनिक खडा पहारा देत आहेत तर काहींनी राणा राहत असलेल्या इमारती खाली जोरदार घोषणाबाजी केली. सध्या दोन्ही भागात तणाव आहे.
आमदार रवी राणा यांनी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हणले आहे की, महाराष्ट्र पोलीस आम्हाला घराबाहेर पडू देत नाहीत. शिवसेनेचे कार्यकर्ते आमच्या निवासस्थानावर हल्ला करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही नेहमीच 'मातोश्री'ला मंदिर मानले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मात्र केवळ राजकीय फायदा मिळवत आहेत