मुंबई:34 आमदारांच्या पत्रासह ( letter from 34 MLAs ) एकनाथ शिंदें (Eknath Shinde) यांनी अधिकृत गटनेतेपदी दावा केला आहे. शिवसेनेच्या वतीने नव्याने नेमण्यात आलेल्या प्रतोद हा अनाधिकृत आहे त्याला तत्काळ पदावरुन हटवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे. शिवसेना विधिमंडळ पक्ष कार्यांलयाच्या लेटर पॅड वर एकनाथ शिंदे यांच्या सह 34 सदस्यांच्या सहीचे पत्र राज्यपाल, विधानसभेचे उपसभभापती आणि सचिवांना पत्र दिले आहे. यात म्हणले आहे की, आम्ही महाराष्ट्र विधानसभेचे अधिकृत सदस्य आहोत. आम्ही शिवसेना या पक्षाचे आहोत. आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदे यांना 31 आक्टोबर 2019 रोजी आमचा गटनेता म्हणुन निवडले. तेव्हा भाजप आणि शिवसेनेत निवडणूक पुर्व युती होती.
Maharashtra Political Crisis : ३४ आमदारांच्या पत्रासह अधिकृत गटनेतेपदावर शिंदे यांचा दावा - Eknath Shinde
34 आमदारांच्या पत्रासह ( letter from 34 MLAs ) एकनाथ शिंदें (Eknath Shinde) यांनी अधिकृत गटनेतेपदी दावा ( Shinde's claim as official group leader ) केला आहे. शिवसेनेच्या वतीने नव्याने नेमण्यात आलेल्या प्रतोद हा अनाधिकृत आहे त्याला तत्काळ पदावरुन हटवावे अशी मागणीही त्यांनी केली आहे.
शासनातील भ्रष्टाचार अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांचे प्रकरण समोर आले. अशा प्रकरणामुळे आमच्या पक्षाची प्रतीमा खराब होत आहे. आम्हाला त्याचा राजकिय आणि वयक्तिक मानसीक त्रास सहन करावा लागतो. विभिन्न विचारसरणीचे पक्ष जे आता सरकारचा एक भाग आहेत आणि आपल्या शिवसेनेचे नाव आणि पत खराब करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाला वैचारीक विरोध करणाऱ्या राष्ट्रवादी आणि काॅग्रेस सोबत सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या पक्षाच्या तत्वज्ञानाशी तडजोड करण्यात आल्याचा आरोप या पत्रात करण्यात आला आहे.